
एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड वितरणाला मुभा
मुंबई : खासगी क्षेत्रातील अग्रणी एचडीएफसी बँकेवरील निर्बंध रिझर्व्ह बँकेने मंगळवारी अंशत: शिथिल केले. त्यामुळे आठ महिने सुरू राहिलेल्या बंदीनंतर बँकेला पुन्हा नवीन क्रेडिट कार्ड वितरण शक्य होणार आहे. तथापि कोणतीही नवीन डिजिटल सुविधा सुरू करण्यावरील बँकेवरील निर्बंध मात्र तूर्त लागू राहणार आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे अनेकवार सेवा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचा दंड म्हणून रिझर्व्ह बँकेने बंदीचे हे अभूतपूर्व पाऊल डिसेंबर २०२० मध्ये टाकले होते. आता ही बंदी उठविण्याचा निर्णय घेताना, माहिती-तंत्रज्ञानविषयक परीक्षण पूर्ण केले गेले आहे, असे एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचे लेखी पत्रही रिझर्व्ह बँकेने मागितले असल्याचे समजते.
बंदीची कारवाई झाल्यापासून एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बँकेबरोबर निरंतर चर्चा-संवाद सुरू ठेवला आहे आणि मिळालेल्या सूचनांनुसार, तंत्रज्ञान प्रणालीत योग्य त्या सुधारणा केल्या आहेत, असे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा