अकरावी प्रवेश : यंदा चुरस वाढणार!
कोल्हापूर:अकरावी प्रवेश घेण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी होणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. अकरावीला प्रवेश कसे होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तरी यंदा चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे 16 जुलै रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर गुणपत्रकांचे वाटप सुरू झाले आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शंभर गुणांची दोन तास कालावधीची ही परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची ठेवण्यात आली. त्यानुसार 20 जुलैनंतर राज्य मंडळाकडून सीईटी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले. 2 ऑगस्ट रोजी ही प्रक्रिया संपली. त्यानंतर परीक्षेसाठी केंद्रनिश्चितीचे काम विभागीय मंडळाकडून सुरू झाले.कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे 1 लाख 39 हजार 543 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या सुमारे 55 हजार 784 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात 35 कनिष्ठ महाविद्यालये असून, सुमारे 14 हजार 600 अकरावीची प्रवेश क्षमता आहे.दरम्यान, सीईटी परीक्षेसंदर्भात सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत सीईटी परीक्षा रद्द केली आहे. अकरावी प्रवेशासाठी पुढे काय करता येईल, याचा अभ्यास करत आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय पाहून पुढील निर्णय घेऊ, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली आहे.
.......................................
------------------------------
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

0 comments :
टिप्पणी पोस्ट करा