Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रेल्वेमार्गालगतच्या अनधिकृत झोपड्यांचा धोका


रेल्वेमार्गालगतच्या अनधिकृत झोपड्यांचा धोका

रेल्वेमार्गालगतच्या अनधिकृत झोपड्यांचा धोका

ट्रॉम्बे-कुल्र्यादरम्यान हजारो झोपड्यांचे अतिक्रमण; ज्वलनशील पदार्थांच्या मालवाहतुकीमुळे आागीची शक्यता

मुंबई : रेल्वेच्या हद्दीत लोहमार्गाजवळ असलेल्या अनधिकृत झोपड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ट्रॉम्बे ते कु र्लादरम्यान रेल्वेची मालवाहतूक करणारी मार्गिका असून लोहमार्गाच्या दुतर्फा हजारो झोपड्यांनी अतिक्रमण के ले आहे. या मार्गावरून रेल्वेच्या मालगाड्यांमधून मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास झोपड्यांना आग लागून परिसरातील अन्य इमारतींनाही धोका होऊ शकतो.

हा धोका टाळण्यासाठी अतिक्रमण के लेल्या झोपड्या हटविण्याची मागणी कुल्र्यातील नेहरुनगर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशनने मध्य रेल्वेकडे के ली आहे. शिवाय रेल्वेमंत्र्यांनाही ट्वीट करून यावर कारवाईची मागणी के ली आहे.

ट्रॉम्बे ते कु र्लादरम्यान मध्य रेल्वेची एकच मार्गिका असून अप-डाऊन करणाऱ्या मालवाहतूक रेल्वेगाड्या येथून जातात. या मालगाड्यांमधून एलपीजी, रासायनिक पदार्थ, कच्चे तेल इत्यादी ज्वलनशील पदार्थांची वाहतूक एचपीसीएल, बीपीसीएल, टाटा पॉवर प्लान्ट आणि रिफायनरीसाठी होत असते. तर या रिफायनरी व प्लांटमधूनही हे पदार्थ रेल्वेच्या मालवाहतूक गाड्यांमधून बाहेरही जातात. ट्रॉम्बे व कु र्लादरम्यान मालवाहतूक करताना या दरम्यानचा भाग अगदीच अरुंद आहे. त्यातच लोहमार्गाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या झोपड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेच्या मालवाहतूक गाडीच्या लोको पायलटला गाडीचा वेग प्रतितास १० किमी किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा लागतो. या भागातून रुळांजवळच कचरा, सांडपाणी किं वा अन्य वस्तूू टाकल्या जात असल्याने लोहमार्गांचीही दैना होत आहे. लोहमार्ग गंजणे तसेच त्याखालील खडी वाहून जाण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे मालवाहतुकीचे डबे घसरण्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे ट्रॉम्बे ते कु र्लादरम्यान लोहमार्गाजवळील दोन्ही बाजूला रेल्वेच्या हद्दीतील अनधिकृत झोपड्या हटविण्याची मागणी ‘जागो नेहरूनगर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशन’ने मध्य रेल्वेकडे केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित कु लकर्णी यांनी दिली. लोहमार्गापासून १५ मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही. तरीही गेली अनेक वर्षे तेथे झोपड्या असून त्यांची संख्या वाढतच आहे. या भागातून रेल्वेकडून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक के ली जाते. त्यामुळे झोपड्यांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याचा फटका रेल्वे व परिसरातील अन्य इमारतींना बसू शकतो. मालवाहतुकीतील ज्वलनशील पदार्थांचा स्फोट झाल्यास झोपड्यांना आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते, असे कुलकर्णी म्हणाले. लोहमार्गापासून २५ ते ३० मीटर अंतरावर असलेल्या म्हाडा व अन्य इमारतींचा पुनर्विकास करताना त्यांना टॉवरचे बांधकाम करायचे असल्यास रेल्वेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे लागते आणि येथे तर लोहमार्गाजवळ झोपड्यांचे मजलेच्या-मजले उभारले जात असल्याची टीका त्यांनी के ली.

नेहरूनगर पोलीस ठाण्याचे रेल्वेला पत्र

अग्निशमन दलाने २०१४-१५ मध्ये ट्रॉम्बे ते कु र्ला रेल्वेमार्गादरम्यानच्या कु रेशी नगरमधील झोपडपट्टी परिसराचा अभ्यास अहवाल सादर केला होता. रेल्वेमार्गाजवळील झोपड्यांमुळे धोका उद्र्थ्यांभवू शकतो, असे अग्निशमन दलाने स्पष्ट के ले होते. नेहरूनगर पोलीस ठाण्याने २०१३ मध्ये मध्य रेल्वेला पत्र पाठवून रेल्वेमार्गालगतच्या झोपड्यांमधील रहिवाशांकडून लोहमार्गाजवळच बांधकामाकरिता खोदकाम करणे, रुळांच्या बाजूलाच जेवण शिजविणे आणि गर्दुल्ल्यांकडून नशा करण्याचे प्रकार होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

रेल्वेमार्गाजवळील अनधिकृत झोपड्या किं वा बांधकाम रेल्वेकडून हटवायचे म्हटल्यास अनेक जण त्यात अडथळे निर्माण करतात. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून हस्तक्षेप करण्यात येतो. त्यामुळे अतिक्रमण हटविण्यात अडचण निर्माण होते. तरीही ट्रॉम्बे ते कुल्र्यादरम्यान लोहमार्गाजवळच असलेल्या अनधिकृत झोपड्यांबाबत निर्णय घेऊ. राज्य सरकारशी त्याबाबत चर्चा करणे, त्यांचे अन्यत्र स्थलांतर असे अनेक मुद्देही आहेत. – शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

freshnewsindia24@gmail.com


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment