Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्ह्यात 20 सप्टेंबर रोजी सागरी किनारे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान अभियान उपक्रमाचे आयोजन


 रत्नागिरी जिल्ह्यात 20 सप्टेंबर रोजी सागरी किनारे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान अभियान उपक्रमाचे आयोजन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या माध्यमातून भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात सागरी किनारे व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान अभियान उपक्रम राबवण्यात येणार आहे. सदर श्रमदान अभियानाद्वारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. सागरी किनारी स्वच्छता श्रमदान अभियान या उपक्रमाची प्रमुख संकल्पना प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन हे आहे. प्लास्टिकचा अनिर्बंध वापर व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे पर्यावरण, जमीन तसेच पाणी यांचे प्रदूषण होत असून भविष्यात तसेच वर्तमानातही यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत, होणार आहेत. या बाबींचा विचार करून प्लास्टिक वापरावर नियंत्रण व व्यवस्थापन यावर परिणामकारक कृती कार्यक्रम आयोजनाच्या दृष्टीने सागरी किनारी स्वच्छता श्रमदान अभियान उपक्रम राबवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

..........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा