Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी साधला जिल्ह्यातील सरपंचांशी स्वच्छता संवाद.

 


भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत  महोत्सव वर्षानिमित्त  मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद रत्नागिरी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी साधला जिल्ह्यातील सरपंचांशी स्वच्छता संवाद.


 भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत  महोत्सव वर्षानिमित्त  रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आज दि.25/09/2021 रोजी "सरपंच स्वच्छता संवाद" या चर्चात्मक संवाद उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

"स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून मार्च 2022 अखेर रत्नागिरी जिल्हा हागणदारीमुक्त अधिक (ODF Plus) करूया" असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.विक्रांत जाधव साहेब यांनी  केले.  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ.इंदुराणी जाखड मॅडम यांनी सरपंचांशी संवाद साधत असताना म्हणाल्या की स्वच्छतेमध्ये रत्नागिरीचा इतिहास आहे. देशामध्ये स्वच्छतेत रत्नागिरी जिल्ह्याचा पहिला क्रमांक आला पाहिजे असे काम करूया. 

       उपक्रमांचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) मा.श्री. डी.एस.परवडी यांनी केले. तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जि.प.रत्नागिरी श्री. अजित मांजगावकर यांनी 10 उपक्रमांबद्दल माहिती दिली. शेवटी या संवाद कार्यक्रमामधील सर्व सरपंचांचे आभार  व सूत्र संचालन मूल्यमापन व सनियंत्रण तज्ञ श्रीम. श्रध्दा धनावडे यांनी केले.

या या संवाद उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामसेवक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सदस्य पंचायत समिती चे सभापती उपसभापती व सर्व सदस्य गटविकास अधिकारी विस्ताराधिकारी ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी गटसमन्वयक समुह समन्वयक , जिल्हा कक्षातील सल्लागार व तज्ञ हे उपस्थित होते

.........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा