Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

 काव्यपुष्प आजची   चारोळी

जगण्यासाठी माणसाला
फार मोठी इस्टेट लागत नसते
खऱ्या सुखाची भूक
आत्मसमाधानाने भागत असते

  सौ  हेमा जाधव, सातारा

--------------------------------------------------------------

आई

  आ म्हणजे आत्मा नि ई म्हणजे ईश्वर
  आई म्हणजे साक्षात परमेश्वर
  आई जीवनाचा आरंभ
  आई सुखासमाधनाचा प्रारंभ

  आई भरभरून देऊनही
  कधीच न पुरणारी
  आई त्यागाची मूर्ती
  किर्तीरूपात मागे उरणारी

  आई ही अशाश्वतच
  पण ही गोष्टच न पटणारी
  किती आला राग, लोभ तरी
  आई हवीहवीशीच वाटणारी

  आई म्हणजे माझं जागृत
  नालंदा नि तक्षशिला
  तिच्यापुढं क्षणभंगूर वाटतं
  हे मायावी जीवन मजला

सौ. हेमा जाधव, सातारा
--------------------------------------------------------------

प्रभा..

प्रकाशल्या दिशा दाही
आली लालिमा गगनाशी,
झाले प्रसन्न चराचर सारे
भरल्या चैतन्याच्या राशी.

..नखाते ज्ञानेश्वर..

      .परभणी.
-------------------------------------------------------------

 शब्दगंध..

निर्मळ प्रेमाच्या बंधनामध्ये 
मी- तूपणा याची भावना नसावी 
तू मी की मी तू..ओळखण्याची 
एकरूपता सदैव असावी

सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

------------------------------------------------------------            
सृष्टी

चमचमती
रवी किरणे आली
धरणी न्हाली

रवी तेजाने
तेजाळली ही सृष्टी
सौंदर्य दृष्टी

निसर्ग सारा
चैतन्यदायी दिसे
हृदयी वसे


सौ उषा राऊत

--------------------------------------------------------------
 पाऊस...

थेंब थेंब पावसात
चल होऊ ओलेचिंब
काया तुझी दर्पणात
जणू दिसे प्रतिबिंब

तुझ्या माझ्या प्रेमाला रे
साक्ष देतो पाऊसही
बघ गंध दरवळे
चिंब ओल्या मातीलाही

मनसोक्त ओले होऊ
दोघे नाचू आनंदात 
गार वारा सोबतीला
साद गोड आवाजा

अंगावर पडे थेंब
तसे शहारले अंग
होते निमित्त मिठीत
तुझ्या येण्यासाठी संग

तुझ्या माझ्या संगतीत
प्रीत मळा माझा फुले
काळे भोर नभ दाटे
हेलकावi मज बोले

संगिता रामटेके गडचिरोली
--------------------------------------------------------------

विषय :- जगावेगळे नाते

 मित्र म्हणु की कोण?

नाते आपले जगावेगळे
मित्र म्हणू की कोण रे
तुझे नि माझे विचार जुळले 
हृदयात कोरके कोरले तुलाच रे 

नाते आपले  जगावेगळे
तुलाच दिला मी भाव रे
नको नको म्हणतां ना ही
शेवटी तू जिंकले मन माझे रे

नाते आपले जगावेगळे
सुरुवातच झाली रुसव्याने
सर्व काही हसण्यावर नेले
प्रीत फुलली तुझ्या हसण्याने

नाते आपले जगावेगळे
जुळले खूप जिव्हाळ्याचे
तू हळूच घेतली जागा हृदयी
मन गुंतले तुझ्यात कायमचे

नाते आपले जगावेगळे
म्हातारपणात झाली भेट
नसे कुणाची तमा मजला
आलास जीवनात जरी लेट

नाते आपले जगावेगळे 
सांभाळू आजीवन आपण
संवाद साधू मोकळेपणाने
होऊ दे एक प्रेम प्रकरण

नाते आपले जगावेगळे
मी तुझी ड्रीम गर्ल हेमा
तू माझ्यासाठी धर्मेंद्र खास
वाढवू दोघां मधल्या प्रेमा 

संगीत रामटेके गडचिरोली

--------------------------------------------------------------
 
सवालों भरी मुलाकात

मोहब्बत कर के एक बात सीखने को मिली।
भरोसा करनें पर आँसुओ से भरी रात मिली।

जिसे दिल  से  चाहते थे  वही  चाहत आज 
हमें किसी  की  बाहों  में  ढ़लती   हुई मिली।

हमें  अपनी पीठ पीछे किसी जाने अनजाने 
चेहरें   के   नाखूनों   की   निशानियां  मिली।

परछाई ढूंढ ते हुए  हम  जिस गली से गुज़रे
सभी  जगह  सवालों भरी  मुलाकात  मिली।

कहानी क्या  लिखें अपनी कागज़ तो मिला
लेकिन स्याही में  ज़हर  की  मिलावट मिली।

शुरुआत  से  अंत तक  शांति न मिली मौत 
माँगी  ख़ुदा से तो ख़ुदा से भी  रज़ा न  मिली।

   नीक राजपूत

   9898693535

--------------------------------------------------------------
अश्रूंचा पाट

दयेचे झरे आटले

भावनांना अंकुर फुटले, मीन हतबल झालो
कल्पनांना अंकुर फुटले, मीन हतबल झालो........

कधी वाटे उंच निळ्या आकाशाची, झेप घ्यावी यशाची
छान स्वप्न सकाळी तुटले,मीन हतबल झालो........

पंख फुटावे मनाला, उडते सैरवैर सर्वत्र
सणवारांचे हर्ष लुटले,मीन हतबल झालो........

गरीबीचे चटके बसले, झोपलो मग उपाशी
शांततेचे मौन खुंटले,मीन हतबल झालो........

शिक्षणा अभावी खरंच, गरीबी येतेचं सर्वांना
क्रांतीचे वारे फार सुटले,मीन हतबल झालो........

अज्ञान पळवा यासाठी, भरपूर शिक्षण शिका
ममतेचे हे नाते जुटले,मीन हतबल झालो........

विषवली जातीयतेची, कायम नष्ट करा
आकाश ही बघून फाटले,मीन हतबल झालो........

एकमेकां साह्य करा,वाट प्रगतीची धरा
मनामध्ये विचार दाटले,मीन हतबल झालो........

जगा आणि इतरांना स्वेच्छेने, जगू द्या आनंदाने
वैरत्वाने दुःखचं वाटले,मीन हतबल झालो........

जनसेवा हीच ईश्वर सेवा, अनुसरा मार्ग खरा
स्वर्गाचे सारे सौख्य साठले,मीन हतबल झालो........

खोटी आशा दाखवून, मोठ्या नेत्यांनी केली निराशा
गरीबांचे सुखचं लाटले,मीन हतबल झालो........

गरीबी श्रीमंतीची दरी,वाढत चालली जगात
दयेचे समतेचे झरे आटले,मीन हतबल झालो........

देविदास हरीदास वंजारे

 ता.किनवट जि.नांदेड
-------------------------------------------------------------

विषय:- आयुष्यावर बोलू काही

शीर्षक:- जीवन सुंदर आहे

मानवी जीवन सुंदर आहे
घ्यावा आनंद जगण्याचा
सर्व प्राण्यात बुध्दीमान प्राणी
कर वर्तन मानवा माणुसकीचा

मानवी जीवन  सुंदर असे
आयुष्यावर बोलू काही
जीवन हे अनमोल आहे
दुसऱ्यांदा मिळणार नाही

आयुष्यावर बोलू काही
येऊ द्या जरी अनेक संकटे
विवेक शील बुद्धीने सोडावा
जरी असाल संकटी एकटे

आयुष्यावर बोलू काही
सु:खा मागे, दुःख येतील
दु:खा मागे,  सु:ख येणार
सुखदुःखांचे जीवनचक्र असेल

आयुष्यावर बोलू काही
जीवन जगा प्रामाणिक
नको कुणाचा आकस, हेवा
मरणा अंती नाव घेती अनेक

आयुष्यावर बोलू काही
आयुष्याच्या वळणावर
काटेरी जीवन रुपी मुकुट
चालावे लागे वाट वळणदार

संगीता रामटेके गडचिरोलीShare on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा