
वर्ध्यात अतिवृष्टीमुळे कोसळलं घर; दांपत्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला,तर पतीला दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला
पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून तासांत झालेल्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार तडाखा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे जोरदार पाऊस कोसळला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. वर्ध्यातील अतिवृष्टीमुळे अनेक घरे कोसळली आहेत. वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील दहेगा व गोंडी येथे पावसामुळे घर कोसळल्याने पती पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
आर्वी तालुक्यातील दहेगाव व गोंडी येथे पावसाने घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच एका घटनेत पती पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे. दहेगावतील चौधरी कुटुंबाचा घरागालागत पक्का गोठा आहे. रात्री अतिवृष्टी झाल्याने गोठा व घर कोसळले. त्यात पती रामकृष्ण चौधरी (४५) व पत्नी ज्योती (४०) मुलगा आदित्य(१५) घराच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला,तर पतीला दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर जखमी अवस्थेतील मुलगा गंभीर असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू करण्यात येत आहेत.
वर्ध्यात दोन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून अंदाजे तीस ते चाळीस घरे कोसळली आहेत,अशी माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा