
नेत्रदान चळवळीला आर्थिक पाठबळ हवे!
अवयव प्रत्यारोपण सुविधेसह रुग्णालय उभारण्याचा ‘दिशा फाऊंडेशन’चा संकल्प
नेत्रदानाबाबत गैरसमज, अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरेचा पगडा असूनही गेल्या काही वर्षांत नेत्रदान चळवळीला बळ मिळत आहे. मात्र, राज्यातील मृत्यूचे प्रमाण आणि नेत्रसंकलन यात मोठी तफावत असून, ती कमी करण्याबरोबरच नेत्रदान चळवळीच्या विस्तारासाठी आर्थिक पाठबळ हवे आहे.
‘दिशा मेडिकल अॅन्ड एज्युके शन फाऊंडेशन’ ही संस्था गेल्या १३ वर्षांपासून नेत्रदान आणि अवयवदानासाठी जनजागृती करत आहे. स्वप्निल गावंडे आणि त्यांच्या ६ सहकाऱ्यांनी २००८ मध्ये या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर १८०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचे जाळे तयार केले आहे. नेत्रदानाबरोबरच अवयवदानासाठीही ही संस्था नागरिकांना प्रोत्साहन देते. अमरावतीत सुमारे ६ हेक्टर जागेवर अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधेसह सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी प्राथमिक पूर्वतयारीही सुरू आहे. या कामासाठी निधीची आवश्यकता आहे. ‘दिशा’ संस्थेने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अधिकाधिक संख्येने या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले.
संस्थेने शाळा-महाविद्यालयांमधून हजारांवर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर नेत्रदानाची माहिती असलेल्या व्यक्ती लगेच नेत्रपेढीशी संपर्क साधतात किंवा स्वयंसेवकांपर्यंत नेत्रदानाची माहिती पोहोचवतात. नेत्रदानाच्या माध्यमातून अकराशेवर रुग्णांना लाभ मिळाला आहे. सुमारे साडेचार लाख लोकांनी ऐच्छिक नेत्रदानाचा संकल्प केला आहे. नोकरीच्या निमित्ताने परराज्यांमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील स्वयंसेवकांनी त्यांच्या शहरांमध्ये हे काम सुरू केले आहे. दिशा संस्थेने अमरावतीत नेत्रपेढी सुरू के ली आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदाअंतर्गत नोंदणीकृत असलेली ही अमरावती जिल्ह्यातील एकमेव धर्मादाय नेत्रपेढी आहे. या नेत्रपेढीला आता आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. यवतमाळ, वाशीम, बुलढाणा येथे दिशा आय बँकेच्या शाखा कार्यरत आहेत.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा