Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गणेशभक्तांसाठी कोकणची वाट यंदाही खडतरच


गणेशभक्तांसाठी कोकणची वाट यंदाही खडतरच

गणेशभक्तांसाठी कोकणची वाट यंदाही खडतरच

गेली ११ वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे.


 दरवर्षी पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावर शेकडो खड्डे असतात. खाचखळग्यातून आदळत आपटत कोकणवासीयांचा प्रवास सुरूच राहतो. गणेशोत्सवाच्या तोंडावर महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्याच्या खड्डय़ांची चर्चा होते. संबंधित यंत्रणांना रस्ते दुरुस्तीची तारीख दिली जाते. कामे केली जातात. थोडय़ा पावसात पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते. याचाच अनुभव मुंबईतून कोकणात निघालेल्या प्रवासी आणि वाहनचालकांना सध्या येतो आहे.

गेली ११ वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे. मात्र महामार्गाचे काम काही आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नाही. भूसंपादनातील दिरंगाई, पर्यावरणविषयक परवानग्याना झालेला उशीर, ठेकेदाराची अकार्यक्षमता, निधीची कमतरता आणि आता टाळेबंदी यासारख्या कारणामुळे महामार्गाचे काम लांबतच चालले आहे. पळस्पे ते इंदापूरपाठोपाठ आता इंदापूर ते झाराप या टप्प्यातील कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे.

पेण ते इंदापूर मार्गातील परिस्थिती दयनीय आहे. इंदापूर ते महाडपर्यंतचा रस्ता खराब आहे. त्यामुळे खड्डय़ांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

वडखळ ते गडब, नागोठणे ते कोलाड, इंदापूर ते माणगाव, टोळ ते महाड आणि महाड ते पोलादपूरदरम्यानच्या महामार्गाची परिस्थिती बिकट झाली आहे. महामार्गावर दिशादर्शक चिन्हांचा आभाव आहे. रस्त्यावर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे.

गणेशोत्सव आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. आजपासून गणेशभक्त कोकणच्या दिशेने निघण्यास सुरवात होणार आहे. गणेशभक्तांसाठी एसटीच्या १ हजार ३०० विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. मात्र नेहमीप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या मार्गात खड्डय़ांचे विघ्न कायम आहे.

गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्यात आले होते. खडी आणि माती टाकून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पण पावसाचा जोर कायम असल्याने खडी मातीच्या मलमपट्टीचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग खड्डय़ातच

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश शासनाने दिले होते. मात्र रस्त्यांची दुरुस्ती करण्यात महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार अपयशी ठरले. पेण ते वडखळ, वडखळ ते नागोठणे, आणि कोलाड ते इंदापूपर्यंत महामार्गावर खड्डय़ांचे अवतारकार्य सुरूच होते. ट्रॅक्टरमधून माती आणि खडी आणून खड्डे बुजवण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकही लावण्यात आले. मात्र हे प्रयत्नही अपुरे ठरले आहेत.

महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. वाहने चालवताना त्रास सहन करावा लागतो आहे. खड्डय़ातून आदळत आपटत प्रवास करावा लागतो आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्त्याची दुरवस्था कायम आहे. पाऊस असला तर खड्डय़ांचा आणि धुळीचा त्रास होत आहे.

 संतोष म्हात्रेवाहनचालक

मुंबई गोवा महामार्गासह जिल्ह्य़ातील अंतर्गत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी असे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी झालेल्या कामाचा फेरआढावा घ्यावा अशा सुचना केल्या आहेत. आठ तारखेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत येतील अशी अपेक्षा आहे.

– आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा