Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचा देखील स्वबळाचा नारा




 

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचा देखील स्वबळाचा नारा

राष्ट्रवादीने आपल्या निर्णयावर ठाम रहावे: रमेश शहा

रत्नागिरी प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी कांग्रेसने आपल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर ठाम रहावे. कारण कांग्रेस पण नगर परिषद निवडणूक स्वबळावरच लढणार आहे. असा दावा कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश शहा यांनी केला आहे. रत्नागिरी शहरातील सर्व कार्यकर्त्त्यांची पण हि निवडणूक स्वबऴावर लढण्याची इच्छा असून त्यासाठी शहर कॉंग्रेसने एक कोअर कमिटी बनविली आहे. पितृपक्ष संपल्यावर या कोअर कमिटीची घोषणा कांग्रेसचे शहर अध्यक्ष करतील. रत्नागिरीतील जनता कांग्रेसने केलेल्या विकासाची आठवण करीत आहे. तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका कॉंग्रेस स्वबळावर लढण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. रत्नागिरी नगरपालिका निवडणूक कॉंग्रेस स्वतःच्या अजेंड्यावर अथवा स्वबळावरच लढणार आहे. अशी प्रतिक्रिया रमेश शहा तांनी व्यक्त केली आहे.
.........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा