Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

लंडनमधील रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची होणार विक्री; ममता बॅनर्जींनी दर्शवली खरेदीची तयारी


Rabindranath-Tagore


लंडनमधील रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची होणार विक्री; ममता बॅनर्जींनी दर्शवली खरेदीची तयारी


१९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील "ब्लू प्लाक" इमारतीत राहिले होते.लंडनमध्ये ज्या घरात रवींद्रनाथ टागोर राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार आहे. भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या या इमारतीची किंमत २,६९९,५०० डॉलर म्हणजेच २७.३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत मालमत्तेच्या किंमती आणि लंडनमध्ये घर ज्या ठिकाणी आहे, ते पाहून फार कमी असल्याचं म्हटलं जातंय. १९१२ मध्ये रवींद्रनाथ टागोर काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील “ब्लू प्लाक” इमारतीत राहिले होते. दरम्यान, २०१५ मध्ये लंडन दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारतर्फे रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

२०१५ मध्ये लंडनच्या पहिल्या भेटीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, “टागोर ज्या घरी राहत होते, ते घर खरेदी करण्यास आमचे सरकार उत्सुक आहे. टागोर हे आमचा अभिमान आहेत. ही एक खासगी मालमत्ता आहे म्हणून, मी माझे उच्चायुक्त (त्या वेळी रंजन मथाई) यांना विचारले होते की आपण या इमारतीसाठी सौदा करू शकतो का. त्यावेळी ही मालमत्ता विकली जाणार नव्हती, पण आता त्याची किंमत ठरवण्यात आली आहे.”

या घरावर निळ्या रंगाचा फलक लावण्यात आलेला असून प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहत असत, असं त्यावर लिहिलेलं आहे. हा फलक लंडन कंट्री कौन्सिलने लावली होता. दम्यान, आता या घराची जबाबदारी इंग्लिश हेरिटेज ट्रस्टवर आहे. टागोर वगळता इतर काही भारतीयांची नावे असलेले निळे फलकही लंडनमध्ये लावण्यात आले आहेत. ज्यात महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, अरबिंदो, बाळ गंगाधर टिळक, व्ही.डी. सावरकर आणि व्ही. कृष्णा मेनन यांचा समावेश आहे. “भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर, १८६१-१९४१ आणि १९१२ मध्ये इथे राहिले होते,” असं त्या फलकावर लिहिलेलं आहे.

पश्चिम बंगाल सरकारने हे घर खरेदी करण्यास उत्सुकता दाखवल्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती स्वराज पॉल यांनी आनंद व्यक्त केलाय. ते म्हणाले की, हे घर भारत सरकार किंवा पश्चिम बंगाल सरकार खरेदी करू शकते. २०१५  मध्ये, जेव्हा ममता बॅनर्जी लंडनला गेल्या, तेव्हा स्वराज पॉल यांनी त्यांना चहासाठी आमंत्रित केले होते. पॉल म्हणाले की, टागोर बिल्डिंग खरेदी करण्यासाठी सरकार एक समितीही बनवू शकते आणि जर त्यात माझा समावेश असेल तर मला आनंद होईल, असंही ते म्हणाले.

घराचा इतिहास..

ट्रस्टच्या मते हिथवरील घर क्रमांक ३ मध्ये १९१२ वर्षात उन्हाळ्यात काही महिने रवींद्रनाथ टागोर इथे राहायचे. लंडनच्या तिसऱ्या भेटीदरम्यान ते येथे राहिले होते. त्या वेळी त्यांच्या राहण्याची व्यवस्था कलाकार आणि लेखक सर विल्यम रोथेनस्टाईन यांनी केली होती. सर विल्यम तेव्हा ११ ओक हिल पार्क मध्ये राहत होते. मात्र, आता त्यांचे निवासस्थान पाडले गेले आहे.

.................
------------------------------

www.freshnewz.in


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा