शब्द लहरी
विचारधारा
जे, कुणी व्यक्ती, सत्य ओळखून त्याला पूर्ण निष्ठेने आत्मसात करून सारं आयुष्यभर झटत असते. तेव्हा, त्याचेच स्वतः जवळील... व, समाजातील लोक सुध्दा निंदा, चेष्टा, तिरस्कार करून सोडत असतात. पण, एक दिवस त्याच, माणसाची मुखामुखात गोड वाणी,व जागोजागी पुतळे उभारून त्यांना वंदन केल्या जाते. म्हणूनच, एकादी व्यक्ती, समाजामध्ये चांगले कार्य करीत असेल तर..त्यांना साथ द्यावी व, जिवंतपणीच त्यांना एकदाचे ओळखावे तो, महान व्यक्ती, जगात नसतांना कितीही आपण, मानवंदना दिले किंवा पुजले तरी... ते, बघायला कधीच येत नाही. हे,सत्य आहे.
सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
-----------------------------------------------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
अथवा ऐसा नेणसी । तू अंतवंतचि
मानसी । तरी शोचू न पवसी ।
पंडुकुमरा ।।
जो आदि स्थिती अंतू । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो
अन्युस्युतु गंगाजळाचा ।।
ते आदी नाही खंडले ।समुद्री तरी
असे मिनले । आणि जाताचि मधे
उरले ।। दिसे तैसे ।।
हे अर्जुना आत्मा अविनाशी आहे.
हा विचार कळत नसल्याने तो नाशवंत
आहे असे जरी तू मानले तरी देखील
तुला शोक करण्याचे कारण नाही .
कारण गंगेच्या पाण्याचा ओघ ज्या प्रमाणे अविछिन्न आहे .त्या प्रमाणे
उत्पत्ती , स्थिती ,व लय यांचा क्रम
प्रवाहही अखंडित आहे .
ते गंगेचे पाणी उगमाच्या ठिकाणी
खंड पावलेले नसते .पुढे ते समुद्राला
जाऊन एकसारखे मिळत असते
आणि जात असतांना मध्यंतरी
वाहत्या प्रवाहातही ते पाणीच दिसते
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक
-----------------------------------------------------------------------------------
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा