Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गणेशोत्सवात भेसळयुक्त मिठाई: ‘एफडीए’च्या पथकांची नजर


गणेशोत्सवात भेसळयुक्त मिठाई: ‘एफडीए’च्या पथकांची नजर

Advertisement

गणेशोत्सवात भेसळयुक्त मिठाई: ‘एफडीए’च्या पथकांची नजर


मिठाई तपासणीसाठी पथक


 गणेशोत्सवात माव्याचे मोदक, तसेच खव्याला मागणी वाढते. मागणीच्या तुलनेत राज्य तसेच परराज्यातून होणारी खव्याची आवक कमी पडल्याने काही मिठाई विक्रे ते भेसळयुक्त मिठाईची विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) शहर आणि उपनगरातील मिठाई विक्री दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

मिठाईतील भेसळीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची नजर राहणार असून भेसळयुक्त मिठाई विक्री करणाऱ्या मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच भेसळयुक्त मिठाईचे नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. उत्सवाच्या काळात मिठाई विक्री दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून या पथकात १७ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे.

गणेशोत्सवात मिठाईला मागणी वाढते. काही मिठाई विक्रेते गैरफायदा घेऊन भेसळयुक्त मिठाई विक्री करतात. भेसळयुक्त मिठाईमुळे सामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भेसळयुक्त मिठाई विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मिठाई वापराचा कालावधी बंधनकारक

अन्न आणि औषध प्रशासनाकडून शहरातील सर्व मिठाई विक्रेत्यांना मिठाईच्या थाळीवर (ट्रे) मिठाई वापराबाबतचा कालावधी (यूज बाय डेट) टाकणे बंधनकारक केले आहे. मिठाई  विक्रेत्यांनी मिठाईच्या थाळीवर चिकटवलेल्या कागद पाहावा. त्यावर मिठाई किती दिवसांसाठी खाण्यास योग्य आहे, याची शहानिशा क रणे गरजेचे आहे. काही गैरप्रकार आढळल्यास त्वरित अन्न आणि औषध प्रशासनाकडे (टोल फ्री क्रमांक-१८००२२२३५६) तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात भेसळयुक्त मिठाई विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तयार केली आहेत. गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकांनी मध्यभाग तसेच उपनगरातील मिठाई विक्रेत्यांची तपासणी सुरू केली आहे.

– शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग, पुणे विभाग

.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा