Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गणेशोत्सवात कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार सरी


Maharashtra Rain Update, Maharashtra Weather Alert,
Advertisement

गणेशोत्सवात कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार सरी



काही ठिकाणी अतिवृष्टीचाही हवामान विभागाचा इशारा


गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण विभागात सध्या पाऊस सुरू असून, १२ सप्टेंबरपासून त्याचा जोर वाढणार आहे. पश्चिम-मध्य महाराष्ट्रातही याच कालावधीत काही भागांत मुसळधार पाऊस होणार असून, विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि मराठवाड्याच्या परिसरात असलेली वाऱ्यांची चक्रीय स्थिती यामुळे ७ सप्टेंबरला मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात विविध ठिकाणी धुवाधार पावसाने तडाखा दिला. काही भागांत पुराचे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले. मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम आहे. बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत असून, हे क्षेत्र तीव्र होऊन पश्चिाम-उत्तर दिशेने सरकणार आहे. त्याचप्रमाणे सध्या ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभागात पाऊस कायम राहणार असून, ११ किंवा १२ सप्टेंबरपासून काही भागांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १३, १४ सप्टेंबरला किनारपट्टीलगतच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही १२ सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी पाऊस होणार असून, पश्चिम-मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होणार असून, विदर्भात १३, १४ सप्टेंबरला काही भागांत मुसळधारांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पाऊसभान…  हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात सर्वच ठिकाणी १४ सप्टेंबरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांत १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत १र्१ ंकवा १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरीत कमी-अधिक प्रमाणात पाऊस असेल. १३ सप्टेंबरला रायगड आणि १४ सप्टेंबरला पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत १३ सप्टेंबरपासून घाट विभागांत पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यांत १३, १४ सप्टेंबरला काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे.

.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा