Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कुपोषणाने मृत्यू होतच असतील तर कल्याणकारी योजनांचा उपयोग काय?


कुपोषणाने मृत्यू होतच असतील तर कल्याणकारी योजनांचा उपयोग काय?

कुपोषणाने मृत्यू होतच असतील तर कल्याणकारी योजनांचा उपयोग काय?



महिनाभरात ४० बालमृत्यूंवरून न्यायालयाने फटकारले



कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबत नसतील तर आदिवासींसाठीच्या कल्याणकारी योजनांचा उपयोग काय? या योजना कठोरपणे राबवत असल्याचा तुमचा दावा असेल तर मग कुपोषणामुळे होणारे मृत्यू का थांबत नाहीत, असा संतप्त प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित के ला. आदिवासींच्या कल्याणासाठीच्या कागदावर असलेल्या योजनांचा पाढा आमच्यासमोर वाचू नका, तर कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू कसे थांबवणार, त्यासाठी तातडीने काय उपाययोजना करणार हे सांगा, असेही न्यायालयाने सरकारला बजावले.

यापुढे कुपोषणामुळे एकही मृत्यू झाल्यास राज्याच्या आरोग्य सचिवांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा न्यायालयाने दिल्यानंतर गेल्या महिन्याभरात कुपोषणामुळे ४० बालमृत्यू, तर २४ प्रकरणांत मृत मुले जन्मल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू याने यांनी न्यायालयाला दिली. शिवाय न्यायालयाने या भागांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्याचे आदेशही  दिले होते. मात्र त्यानंतरही या भागांतील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे याचिकाकत्र्यातर्फे  सांगण्यात आले. त्यावर कु पोषणाच्या समस्येचे निवारण करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांनी या योजना न्यायालयाला सांगण्याचाही प्रयत्न के ला.

…तर कारवाई करा

मेळघाट आणि राज्यातील अन्य आदिवासी भागांतील आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा कुंभकोणी यांनी केला. परंतु सरकारच्या प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीवर न्यायालयाने बोट ठेवले. त्यानुसार पुणे, नागपूरमधील आरोग्य केंद्रांवर १०० टक्के वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत गडचिरोली, गोंदिया येथे मात्र डॉक्टरांची वानवा असल्याचे दिसून येते. त्यावर ग्रामीण व आदिवासी भागांमधील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियक्ती केली जाते. पण या भागांमध्ये डॉक्टर जाण्यास उत्सुक नसल्याचे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मात्र हे कारण ऐकले जाऊ शकत नसल्याचे सुनावत अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाच्या सूचना

या भागांमध्ये कुपोषणामुळे मृत्यू होत आहेत. त्यामुळे या भागांतील आरोग्य केंद्रांवर आहारतज्ज्ञ नियुक्त करण्याबाबत विचार करा. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या भागांत घरोघरी पाहणी करून तेथील नागरिकांच्या आरोग्याची स्थिती जाणून घ्या, तसेच त्यादृष्टीने उपाययोजना करा. कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयातून दररोज एक वैद्यकीय अधिकारी कारागृहात जातो. त्याच धर्तीवर या भागांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवण्याचा विचार करा.

...........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा