Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पवार-मुख्यमंत्री बैठक



पवार-मुख्यमंत्री बैठक


सद्यस्थितीबाबत चर्चा


राज्यात ओबीसी आरक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात तापलेले वातावरण आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी बैठकीत शिवसेनेच्या पालकमंत्र्यांबद्दल के लेल्या तक्रारींच्या पाश्र्वाभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ कोटी ३६ लाख रुपयांचा धनादेश पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द के ला.

गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय तापत असून सर्वच पक्षांसाठी तो संवेदनशील विषय आहे. तसेच गेल्याच आठवड्यात १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी दिलेल्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्यावरून उलट-सुलट चर्चा रंगली. याचबरोबर आता राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेतील जागेवरही निवडणूक जाहीर झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वाभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याने दोघांमध्ये सद्यस्थितीबाबत खल झाला.

दरम्यान, रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (कोविड-१९) २ कोटी ३६ लाख ८४ हजार ७५७ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा