Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्ह्यात तालुकानिहाय टूरिस्ट हब तयार करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार

 



रत्नागिरी जिल्ह्यात तालुकानिहाय टूरिस्ट हब तयार करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार


कृषी मालाच्या विक्रीसाठी महामार्गांवर शॉप्स उभारण्याचा विचार

जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांचे प्रतिपादन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

1980 सालापासुन जागतिक पर्यटन दिन साजरा करतो. आज आपल्या कोकणात अनेक फळे, फुले, भाज्या, अन्य शेती उत्पादने घेतली जातात. हे कोकणी पदार्थ, शेती उत्पादमे जगापर्यंत पोचले जावेत. रत्नागिरी जिल्हा निसर्गसंपन्न आहे. इथे सागर किना-यांचे वैविद्य इथे आहे. त्याचप्रमाणे साहसी पर्यटन, बायो डायव्हर्सिटी, कातळशिल्पे, कातळांचे भौगोलिक महत्त्व, धार्मिक स्थळे, पुरातन मंदिरे आदींमुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. मात्र कोव्हिडमुळे जिल्ह्याची, राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली. त्यात सर्वाधिक झळ पर्यटन क्षेत्राला बसली. रत्नागिरीत पर्यटक आले पाहिजेत. त्यासाठी जिल्ह्यात जी उत्पादने घेतली जातात त्या उत्पादनांचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग झाले पाहिजे. त्यासाठी येथील युवक, युवतींना मार्केटिंग, हॉस्पिटलिटीसाठी प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे. नुकत्यापार पडलेल्या एका बैठकीमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी, मार्केटिंगसाठी शॉप्स उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. पर्यटन दृष्ट्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय टूरिस्ट हब तयार करायचे आहेत. पायाभूत विकास नक्किच होईल. येथील विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सरकार म्हणून सतत प्रयत्न करित आहेत. पर्यटनासंदर्भात डॅश बोर्ड तयार झाले पाहिजेत. रत्नागिरी जिल्ह्याची सर्व माहीती एका क्लिकवर सर्वांनाच उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरु केले जाणार आहेत. असे मत रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त अपरिचित रत्नागिरी या विषयावरील परिषद सोमवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेच्या वतीने मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे कोरोना विषयक नियम पाळून परिषद आयोजीत केली होती. या परिषदेत उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील व्यासपिठावरुन बोलत होते.

या कार्यक्रमावेळी रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई, कॉंग्रेस पक्षाचे  नेते व रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, माजी आमदार बाळ माने, ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार, रायगडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया आदी मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत राजू भाटलेकर यांनी केले. तर सुत्रसंचालन सुधिर रिसबूड यांनी केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसूरकर, सुनिल सहस्त्रबुद्धे, हॉटेल व्यावसायिक अर्चना गोखले आदींचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की मी सुद्धा एक पर्यटक आहे. मी अनेक देश फिरलो. २५ देशात हॉस्पिटल्स सुरु केली आहेत. अनेक उकृष्ठ ठिकाणी राहता आले. माझ्या मते पर्यटन हा व्यवसाय नव्हे. ते एक शास्त्र आहे. ते मुलभुत घटकांवर अवलंबून आहे. पर्यटनसाठी परिवहन, पायाभूत सुविधा, कम्युनिकेशन, मानसिकता यांची आवश्यकता असते. मात्र आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात म्हणावी तशी यांची उपलब्धता नाही. जिल्ह्यात ऊत्तम रस्ते नाहित. रस्त्यांचे हाल आहेत. एखाद्या गावात जाण्यासाठी खुप लांबून वळसा घालावा लागतो. चांगल्या इंटरनेट सुविधा नाहीत. ऊत्तम जेवणाची राहण्याची व्यवस्था पाहिजे. पर्यटन क्षेत्रात पर्यटकांची मानसिक स्थिती महत्त्वाची आहे. याकडे शास्त्र या स्वरुपात पाहिले तर पर्यटनाला अधिक चालना मिळेल. प्रत्येक गावाने पर्यटनदृष्ट्या एक कल्पना दत्तक घेऊन पर्यटन हब म्हणून विकसित होऊ शकते. असे मत व्यक्त केले. 

बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार आपल्या भाषणात म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यात अनेक धरणे, धबधबे, नद्या, नाले आहेत. जिल्ह्याला चांगली निसर्गाची देणगी आहे. लोकमान्य टिळक स्मारक आहे. अनेक नररत्नांची ही भूमी आहे. पर्यटकांना यांची माहीती झाली पाहिजे. पर्यटक काय विचार करतोय आणि रत्नागिरी त्यांना काय देणार आहे आणि काय देऊ शकत नाही. याचा विचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विमानतळ झाले पाहिजे. रेल्वेचा अजुन विकास झाला पाहिजे. अजून रेल्वे गाड्या वाढू शकतात का? रेल्वेमध्ये आणखी काय सुविधा देता येऊ शकतात याचा विचार झाला पाहिजे. समुद्रकिनारे खुप छान आहेत. पर्यटन दृष्ट्या हे समुद्रकिनारे आणखी विकसित झाले पाहिजेत. मुलभुत सुविधा पर्यटकांना मिळाल्या पाहिजेत. कृषी पर्यटन, हॉटेल्स, जंगल, फिशरिज यांचा विकास झाला पाहिजे. शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांचा प्रचार, प्रसार झाला पाहिजे. बँक ऑफ इंडिया ग्राहकांना ऊत्कृष्ठ सेवा देत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी बँक ऑफ इंडिया आवश्यक तिथे नक्किच योगदान देईल. असे मत व्यक्त केले.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा