Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरीतील युवकांकडून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदासाठी सिद्धेश शिवलकर यांची फेर नियुक्ती करण्याची मागणी



 रत्नागिरीतील युवकांकडून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदासाठी सिद्धेश शिवलकर यांची फेर नियुक्ती करण्याची मागणी 


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सिध्देश शिवलकर यांची गेल्याच महीन्यात तालुका अध्यक्ष पदाचे फेर नियुक्तीचे पत्र चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते युवक जिल्हा अध्यक्ष योगेश शिर्के यांनी दिले असताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांनी बदलण्याचे आदेश काढले. प्रदेश अध्यक्ष स्थानिकांची मते डावलून युवक तालुकाअध्यक्ष बदलत असल्याचे कळताच जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी तसेच रत्नागिरी तालुक्यातील सर्व नेत्यांनी सिध्देश शिवलकर हेच परत युवक अध्यक्ष व्हावेत अशी मागणी करून त्यासाठी निरिक्षक पाठवण्याची मागणी केली. युवक प्रदेश अध्यक्ष यांच्या हट्टीपणामुळे लगेच दुस-या दिवशी निरिक्षक उदय जावके यांना रत्नागिरीमध्ये पाठवण्यात आले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. रत्नागिरीमध्ये युवक निरिक्षक आले असता रत्नागिरी तालुक्यातील युवक कार्यकर्ते आणि पदाधीकारी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. त्यांनी सिध्देश शिवलकर यांचीच तालुक्यामध्ये संघटना वाढिसाठी फेर नियुक्ती व्हावी अशी मागणी केली असल्याचे युवक तालुका उपाध्यक्ष निलेश खोराटे व सुकेश शिवलकर यांनी सांगितले.

स्थानिक सर्व नेत्यांची मते तसेच रत्नागिरी तालुक्यातील युवक पदाधिका-यांची मोठी मागणी लक्षात घेऊन गेल्या महीन्यामध्ये सिध्देश यांची फेर नियुक्ती करण्यात आली असताना युवक अध्यक्ष बदलण्याचे आदेश प्रदेशवरून येणे म्हणजे स्थानीक पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांना डावलून निर्णय घेत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सरचिटणीस रईस नाकाडे, उपाध्यक्ष वैभव नैकर यांनी सांगितले. रत्नागिरीमध्ये निरिक्षक आल्यावर त्यांनी युवक पदाधीकारी यांची उपस्थीती आणि त्यांची मते जाणून घेतल्यावर 2 दिवसामध्ये प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे अहवाल देण्यात येईल आणि तालुका अध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले. रत्नागिरीमध्ये तालुका अध्यक्ष सिध्देश शिवलकर यांना पाठींबा देण्यासाठी युवक पदाधीकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत राहून सिध्देश शिवलकर यांची संघटना मजबुत करण्यासाठी फेर नियुक्ती करावी अशी मते मांडली असल्याचे शिरगाव जि.प.गट अध्यक्ष इप्तिकार मुजावर यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातिल अनेक नेत्यांनी आणि रत्नागिरी तालुक्यातील जेष्ठ नेत्यांनी तसेच सर्व सेलच्या अध्यक्षांनी सिध्देश शिवलकर यांनाच येणा-या शहरातील आणि तालुक्यातील निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन रत्नागिरी युवक तालूका अध्यक्षपदी फेर नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी केली असल्याचे पावस प.स गण अध्यक्ष संजय नैकर यांनी सांगितले. गेल्याच महीन्यामध्ये जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकम यांच्या हस्ते युवक जिल्ह्याध्यक्ष योगेश शिर्के यांनी सिध्देश शिवलकर यांची फेर निवड केली असताना आता आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे चित्र आज जिल्ह्यासमोर दिसुन येत आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा