Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रुग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकांचा पगार १९ हजार; हाती मिळतात फक्त ६ हजार



 रुग्णवाहिकेच्या कंत्राटी चालकांचा पगार १९ हजार; हाती मिळतात फक्त ६ हजार


कोविड योद्धे कंत्राटी चालकांची पिळवणूक

कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाका

पगार थेट वाहनचालकाच्या खात्यात जमा करा

जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार- अनिकेत पटवर्धन


रत्नागिरी- जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिमहत्त्वाच्या असणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकांची पिळवणूक होत आहे. एका खासगी कंपनीचे कंत्राटी १०२ चालक कार्यरत आहेत. कारण चालकांचे मुळ वेतन १७ ते १९ हजार रुपये आहे, पण हातात फक्त ६ ते ७ हजार रुपयेच मिळतात. हा पगारही वेळेवर मिळत नाही. २००५ पासून चालक काम करत असून त्यांचा पीएफ कपात केला जात नाही. परंतु ही कंपनी काळ्या यादीत टाकली पाहिजे. यासंदर्भात या चालकांनीही तक्रार दिली आहे. परंतु पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीची बैठक घेण्याची मागणी आयोजित करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे. कामगार अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.

यासंदर्भात त्यांनी सांगितले, कंत्राटी चालकांचा प्रश्न अनेक वर्षे सुटत नाही. मी अनेकदा जिल्हा रुग्णालय, जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या कारभारावर बोलतो. चालकांनी माझी भेट घेऊन व्यथा मांडली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. सध्या ते मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे पुढील आठवड्यात भेट घेऊन हा प्रश्न मांडून चालकांच्या थेट खात्यात पगार जमा करण्याचे आदेश देण्याची मागणी करणार आहे.

प्रामाणिक, तत्पर सेवा

कंत्राटी १०२ वाहनचालक रत्नागिरी जिल्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये यावरील १०२ रुग्णवाहिकांवर गेली ७ ते १५ वर्षे प्रामाणिकपणे, तप्तरतेने व सेवाभावीवृत्तीने २४ तास सेवा बजावित आहेत. कंत्राटी भरती प्रक्रियेमुळे त्यांना मिळणारे वेतन आजच्या महागाईचा विचार करता व कामाचे स्वरूप पाहता फारच अत्यल्प आहे. शासनाकडून कंत्राटी कंपन्यांना प्रत्येकी १७००० ते १९००० रुपये वेतन दिले जाते. परंतु कंत्राटी कंपनी अशकॉम इंडिया, डीएम व इतर कंपन्या या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. या कंपन्या वाहनचालकांना फक्त ७२००/- रुपये ते ८९०० रुपये इतका कमी पगार देते, असे चालकांनी सांगितल्याचे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

पगारासाठी चार महिने थांब..

कंपन्या चालकांची भरती करताना कामाचे तास, कामाची वेळ, मिळणा-या सुट्ट्या, वेतन याबाबत कोणताही खुलासा करत नाही. मात्र या चालकांना कमी पगारावर २४ तास राबवून घेतले जाते. शासनाचे आदेश असतानाही या खासगी कंपन्या ईपीएफ, चालकांना लागणारे ड्रेसकोड, ओळखपत्र इत्यादी आवश्यक सेवा पुरवित नाहीत. पगारासाठी ३-४ महिने वाट पाहावी लागते. कंपन्यांच्या प्रतिनिधींशी अधिका-यांशी दूरध्वनीवरून संपर्क केल्यासा दूरध्वनी उचलले जात नाहीत. तसेच पूर्ण पगार कधीही करत नाहीत. १-२ महिन्यानंतर कधीतरी १०००/- रुपये अथवा अर्धा पगार खात्यावर पाठवला जातो. त्यामुळे या कंपन्या चालकांचा आर्थिक, मानसिक, शारिरीक पिळवणूक करत असल्याचे चालकांनी सांगितल्याचे अनिकेत पटवर्धन म्हणाले.

कोविड अंतर्गत शासनाने तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या वॉर्डबॉयलाही रु. १२०००/प्रति महिना ८ तासासाठी वेतन देत असते. परंतु वाहनचालकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कोरोना योध्दा यासारख्या पोकळ पदव्या देऊन शासन राबवून घेत आहे. यामुळे कंत्राटी वाहनचालकांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते. कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना चालकांच्या समस्यांकडे अजिबात अजिबात लक्ष दिलेले नाही. यामागे कोणाचे राजकिय तसेच आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का? असा सवालही चालकांनी केल्याचे अनिकेत पटवर्धन म्हणाले.

... तर कामबंद आंदोलन

शासनाने कंत्राटी वाहनचालकांच्याच खात्यात थेट वेतन दरमहा पूर्ण रक्कमेचे करावे. याबाबत महिन्याभरात दखल न घेतल्यास सर्व वाहनचालकांना कामबंद आंदोलन अथवा सामुहिक राजीनामे या पर्यायांचा मार्ग स्वीकारावा लागेल, असेही वाहनचालकांनी सांगितल्याचे अनिकेत पटवर्धन म्हणाले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा