Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड खात्यात ७१०.६५ कोटींची देणगी


मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड खात्यात  ७१०.६५ कोटींची देणगी

मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड खात्यात  ७१०.६५ कोटींची देणगी


मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड खात्यात (सीएमआरएफ) ३० जून २०२१ पर्यंत ७१०.६५ कोटी रुपयांची देणगी जमा झाल्याचे माहिती अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. त्यातील २४५.३१ कोटी रुपये ३० जून २०२१ रोजी शिल्लक होते.

करोनाच्या संक्रमणानंतर मार्च २०२० मध्ये लागलेल्या कडक टाळेबंदीमुळे राज्य शासनाचे आर्थिक उत्पन्न खूपच घटले होते. तर दुसरीकडे करोनाच्या विरोधात लढण्यासाठी यंत्रणाही उभारायची होती. दरम्यान, शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड खाते तयार करत उद्योजकांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर ३० जून २१ पर्यंत या खात्यात विविध उद्योजकांसह सामाजिक संस्थांनी ७१०.६५ कोटी रुपयांचा निधी देणगीतून जमा केला. यातील २० कोटी रुपये सेंट जॉर्जेस रुग्णालयात कोविडसाठी अतिदक्षता विभाग तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मदतीने दिला गेला.

करोनाच्या २५ हजार चाचण्या करण्यासाठी आरटीपीसीआरसह इतर साहित्य विकत घेण्यासाठी ३ कोटी ८२ लाख ५० हजार, टाळेबंदीत घरी परतणाऱ्या औरंगाबादमधील रेल्वे दुर्घटनेत दगावलेल्या मजुरांच्या वारसांना ८० लाख, टाळेबंदीतील स्थलांतरित मजुरांचे श्रमिक रेल्वे शुल्क सर्व जिल्ह्य़ाधिकाऱ्यांमार्फत भरण्यासाठी ८२ कोटी २८ लाख २७ हजार २७६ रुपये, रत्नागिरीत करोना चाचण्यांची प्रयोगशाळा उभारण्यासाठी १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० रुपये दिले.

जालनात करोना चाचण्यांच्या प्रयोगशाळेसाठी १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० रुपये, करोना रुग्णांवर रक्तद्रव्य चाचण्यांसाठी १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४ मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांसह १ टीएमसी वैद्यकीय महाविद्यालयांना वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मदतीने १६ कोटी ८५ लाख रुपये, माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानासाठी आरोग्य विभागाला १५ कोटी, कोविड दरम्यान देहविक्री करणाऱ्या महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी ५० कोटी ८० लाख ६२ हजार ५०० रुपये अशी एकूण १९१ कोटी ७० लाख ५३ हजार ६१६ रुपयांची मदत देण्यात आली. असे माहितीच्या अधिकारात मुख्यमंत्री सचिवालयातील लेखा अधिकारी शिरीष पालव यांनी अभय कोलारकर यांना सांगितले.

केंद्राकडून १,२८५.५१ कोटी

करोना काळात महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारकडून करोना आजारासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत १ मार्च २०२० ते २० एप्रिल २०२१ या काळात १ हजार २८५.१८ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यातील ५ ऑगस्ट =२०२१ पर्यंत ६६३ कोटी ९७ लाखांचा निधी खर्च झाला आहे. या अभियानात राज्य शासनाने स्वत:च्या वाटय़ातील ४९ कोटी ४७ लाख रुपयांचा हिस्सा दिला आहे. दरम्यान, राज्य शासनाने नागपूरला ४९.४५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही माहितीच्या अधिकारातून समोर आले.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा