Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन


ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन


जुलै महिन्यात घरी नियमित व्यायाम करत असताना घसरून पडल्यानंतर फर्नांडिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

जुलै महिन्यात घरी नियमित व्यायाम करत असताना घसरून पडल्यानंतर फर्नांडिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंतर्गत जखम झाल्याचे आढळल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी व पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोइली यांच्यासह इतरांनी फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

गांधी घराण्याचे विश्वासू असलेले फर्नांडिस हे त्यांच्या राजकीय आयुष्यात पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले. पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कर्नाटकातील उडुपी मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केले. चार वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले.

सर्वप्रथम १९८० साली लोकसभेवर निवडून गेल्यानंतर १९८४, १९८९, १९९१ व १९९६ मध्ये ते याच मतदारसंघातून विजयी झाले. १९९८ पासून ते चार वेळा राज्यसभेचे सदस्य होते. २००६ ते २००९ या काळात त्यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री म्हणून काम पाहिले. मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांनी अनिवासी भारतीय व्यवहार, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी यांसह विविध खात्यांचे कामकाज सांभाळले.


..............................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा