Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरीत महाबँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप यशस्वी


 रत्नागिरीत महाबँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप यशस्वी 


रत्नागिरी:बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात बँकेतील संघटनांनी सोमवारी पुकारलेला लाक्षणिक संप रत्नागिरी जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी झाला. बँकेचे सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने रत्नागिरी शहर शाखा आणि चिपळूण शाखेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती यामुळे रिकाम्या झालेल्या जागा बँकेकडून भरण्यात येत नाहीत. बँकेचा व्यवसाय वाढत आहे. देशात बँक ऑफ महाराष्ट्र अग्रेसर आहे. अनेक नवीन शाखा उघडल्या जात आहेत. अशा स्थितीत आज अनेक शाखांमध्ये शिपाई, स्वीपरच्या जागा रिक्त आहेत. नवीन क्लार्कची नेमणूक केली जात नाही. याचा विपरीत परिणाम ग्राहकसेवेवर होत आहे. कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे. त्यासाठी तातडीने कर्मचारी भरती करणे आवश्यक आहे. सर्व हंगामी कर्मचा-यांना बँकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, सर्व शिपायांच्या जागा भरण्यात याव्यात, पुरेशा प्रमाणात क्लार्कची भरती करावी, सर्व शाखा आणि एटीएममध्ये सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत, अन्यायकारक बदल्यांचे धोरण रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी संप पुकारण्यात आला होता. नजीकच्या कालावधीत बँक व्यवस्थापनाने सकारात्मक धोरण स्वीकारले नाही, आंदोलन तीव्र करण्यात येईल. येत्या २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी दोन दिवस संप करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा