शब्द लहरी
निसर्ग
माणसाकडे विकासाच्या नावाखाली अनेक यंत्रे आहेत ज्याद्वारे कित्येक वर्षे जगलेला वृक्ष एका दिवसात नेस्तनाभुत केला जातो. जंगलच्या जंगल रिते केले जाते. तेथील प्राणी आणि पक्षी स्थलांतर करतात. त्यांची पाण्याची आणि खाण्याची समस्या आणखी एकदा डोके वर काढते. सर्वच्या सर्व वन्यजीवन विस्कळीत होते. एखादी नदी असेल, तिच्या शेजारील वृक्ष जर तोडले तर ती नदी उन्हाळ्यात सुकून जाते.
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
--------------------------------------------------------------
ज्ञानेश्वरीतील सुंदर प्रतिमाने
ऐसियि मने होआवे । तरी
दोषु न घडे स्वभावे ।म्हणौनि
आता झुंजावे । निभ्रांत तुवा ।।
जया बुद्धीयुक्ता ।जाहलिया
पार्था। कर्मबंधू सर्वथा । बांधू
न पवे .।
जैसे वज्रकवच लेईजे । मग
शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी
जैतेसी उरीजे । अचुंबित ।।
अशा रितीने मनाचा निश्चय
करून तू युद्ध केलेस तर तुला
दोष सहजच घडणार नाहीत
म्हणून तू निःसंदिग्धपणे आता
युद्धास आरंभ कर .
अर्जुना ज्याला निष्काम
बुद्धीने कर्म करण्याची हातोटी
साधली म्हणजे त्याला कर्मबंध
मुळीच बाधत नाही .
ज्या प्रमाणे अंगात वज्र कवच। चिलखत घातले म्हणजे
शस्त्राची व्रुष्टी सहन करता येते.
इतकेच नव्हे तर त्याला शस्त्राचा स्पर्श ही न होता
खात्रीने विजयी होता येते.
सौ. शैलजा जाधव (पाटील)
चांदवड नासिक
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा