Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

१६ सप्टेंबर २०२१ रोजी माध्यमिक विद्यालय सोनवडे ता.संगमेश्वर येथे डाॅ शाश्वत शेरे यांचा आईच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम

 १६ सप्टेंबर २०२१ रोजी माध्यमिक विद्यालय सोनवडे ता.संगमेश्वर येथे डाॅ शाश्वत शेरे यांचा आईच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम 


कै. विश्रांतीदेवी विद्याकुमार शेरे म्हणजेच पूर्वाश्रमीची द्वारका आत्माराम कापडी. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२१ मधला. ज्यावेळी स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि व्यवस्था गावगावातून नव्हती त्या काळात द्वारकाताईच्या वडिलांनी तिला हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी पाठविले. द्वारकाताई कर्तबगार होत्या. होमिओपॅथी चा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यायोगे त्यांनी खुप रुग्णसेवा केली. कुटुंबातील होतकरू सभासदांना शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्यांना तीन अपत्ये. पहिली मुलगी रुजुता अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. प्रथम पुत्र देवराज आता हयात नाही. आणि द्वितीय पुत्र म्हणजे रत्नागिरी स्थित प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे.

 डॉक्टर शेरे यांनी मुंबईत एमबीबीएस आणि त्यानंतर मनोविकार मधे एमडी पूर्ण केले आणि रत्नागिरी मध्ये मानसोपचार तज्ञ म्हणून १९८३ पासून रुग्णसेवा सुरू केली. रत्नागिरी मधील शासकीय मनोरुग्णालयात अधीक्षक म्हणून काही वर्षे काम पाहिले. डॉक्टर शेरे यांच्या सुविद्य पत्नी सौ. शमीन शेरे आणि रत्नागिरीतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या  व्यक्ती असे मिळून आविष्कार नावाची मतिमंद मुलांसाठी कार्य करणारी शिक्षण संस्था सुरू करून नावारूपास आणली. सौ. शमीन शेरे या आविष्कारच्या अनेक वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

 सध्या निवृत्तीनंतरही त्या रत्नागिरी येथे अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून समाजातील विकलांग किंवा differently abled व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी चांगल काम करत आहेत. शेरे दाम्पत्य हे अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक आहेत. नुकतीच डॉक्टर शेरे यांची राज्य शासनाकडून राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावर खासगी क्षेत्रातील नामवंत मनोविकार तज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे.डाॅ.शेरे यांचा गुरुवार दि.१६ सप्टेंबर २०२१ रोजी माध्यमिक विद्यालय सोनवडे ता.संगमेश्वर येथे त्यांचा आईच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष  कार्यक्रम आहे.

..................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा