Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रामायण आणि महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश; संघाच्या नेत्यांचे चरित्र समाविष्ट करण्याचाही प्रस्ताव


Shivraj

रामायण आणि महाभारताचा अभ्यासक्रमात समावेश; संघाच्या नेत्यांचे चरित्र समाविष्ट करण्याचाही प्रस्ताव



तुळशीदासचे “रामचरितमानस” मध्यप्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असेल. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना रामसेतूबद्दल शिकवलं जाणार आहे. तर, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये औषधांचा अभ्यास करण्याचा पर्याय दिला जाईल. “वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हिंदी भाषेतही तयार केले जात आहेत, याची खात्री करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर एक समिती स्थापन करणार आहोत. लवकरच आम्ही हिंदीमध्ये वैद्यकीय अभ्यास देखील सुरू करू,” असे मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले.

उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम समितीच्या शिफारशीनुसार, (रामचरितमानसचे तत्वज्ञान) २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून प्रथम वर्षाच्या बीएच्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्यायी अभ्यासक्रम म्हणून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि ‘भारतीय संस्कृतीच्या मूळ स्त्रोतांमधील अध्यात्म आणि धर्म’, ‘वेद, उपनिषद आणि पुराणातील चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानांमधील फरक’ आणि ‘दैवी अस्तित्वाचा अवतार’ या विषयांचा समावेश असेल.

इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाईल. याचं उद्दीष्ट विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या विविध परिमाणांवर लक्ष केंद्रित करून नेतृत्व क्षमता आणि मानवतावादी वृत्ती विकसित करण्यास मदत करणे आहे. याशिवाय वैद्यकशास्त्रातील पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि वैद्यकीय नैतिकता रुजवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.के.बी. हेडगेवार, भारतीय जनसंघाचे प्रमुख दीन दयाल उपाध्याय आणि डॉ.बी.आर. आंबेडकर यांचे चरित्र समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव म्हणाले, की “हे बदल आपला गौरवशाली इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर आणण्यासाठी करण्यात येत आहेत. हा अभ्यासक्रम विद्वान लोकांच्या शिफारशीनुसार लागू केला जात आहे. नासाच्या अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की राम सेतू हा लाखो वर्षांपूर्वी बांधलेला मानवनिर्मित पूल होता,” असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, भाजपाकडून शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजपा सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य द्यायला हवं, असंही काँग्रेसने म्हटलंय. मध्य प्रदेशमधील कांग्रेसचे आमदार आरिफ मसूद म्हणाले,”भाजपा सरकारनं केवळ रामायण आणि महाभारताचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांनी अभ्यासक्रमात कुरान, बायबल आणि गुरू ग्रंथ साहिबचा देखील समावेश करायला हवा. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून ते सर्व धर्मांना जोडून ठेवते.”

...........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा