Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागणार?




 रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागणार?


कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय निर्णय घेणार? 


रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक मानली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक आगामी काही महिन्यात होऊ घातली आहे. सध्या या बँकेवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा अशा पक्षांच्या सहकार पॅनेलचे वर्चस्व आहे. मात्र संपुर्ण राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. भाजपा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलमध्ये भाजपा असणार का असा सवाल उपस्थीत केला जात आहे. तर दुसरीकडे निवडणुका बिनविरोध करण्याच्या नावाखाली कॉंग्रेस पक्षाला कमी जागांवर समाधान मानावे लागणार अशीही चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देणारे नाना पटोले कॉंग्रेस पक्षावर अन्याय होत असेल तर तो सहन करतील का असा सवाल उपस्थीत केला जात आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात होणा-या या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला केवळ तीन ते चार जागांवरच समाधान मानावे लागेल अशीही चर्चा आहे. ही गोष्ट सत्य झाल्यास यामुळे सहकार क्षेत्रात कॉंग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या नुकसानीचा नक्कीच विचार करतील. रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष वाढवायचा असेल तर सहकार क्षेत्रातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाची महत्त्वाची भूमिका असणे महत्त्वाचे असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कॉंग्रेस पक्षाचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेळीच योग्य ती भूमिका घ्यावी अशा अपेक्षा सर्वसामान्य कॉंग्रेसजनांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

.........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा