Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

श्री गजानना रत्नागिरी शहराची दुर्दशा संपून , साचलेल्या चिखलामध्ये कमळ फुलूदेत - ॲड. दीपक पटवर्धन




श्री गजानना रत्नागिरी शहराची दुर्दशा संपून , साचलेल्या चिखलामध्ये कमळ फुलूदेत - ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी:श्री गजाननाचे आगमन होत असल्याने सर्वजण आनंदात असून सणाची लगबग आणि आवडत्या गणेशाच्या स्वागताचा हर्षोल्लास घराघरात आहे. श्री गणेशाकडे सर्वांसाठी सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य मागतानाच रत्नागिरी शहराची चाललेली दुर्दशा संपू दे. यावर्षी सर्वत्र असणारे खड्डेमय रस्ते, अपूर्ण बांधकाम, रस्त्यात फिरणारी उनाड गुरे, रखडलेली पाणीयोजना, उद्घाटनाच्या प्रतिक्षेत ताटकळलेल तारांगण, बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्यात होणारी कोंडी, दिशाहीन विकासपरांमुख धोरणाने ठप्प झालेली विकास प्रक्रिया, अव्वाच्या सव्वा खर्च वाढवून बिले वाढवण्याच्या उद्देशाने वापरात येणाऱ्या योजना, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टिम उभारण्याच्या होणाऱ्या केवळ वल्गना या आणि अशा अनेक अडचणी नाकर्त्या सत्ताधीशांच्या अकार्यक्षम कारभारामुळे, इच्छाशक्तीच्या अभावामुळे निर्माण झाल्या आहेत आणि यामुळे रत्नागिरीची दुर्दशा झाली आहे. सोशिक संय्यमी रत्नागिरीकर शहरातल्या प्रत्येक रस्त्यातल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये रस्ता शोधत गेले सहा महिने वावरत आहेत. हे गणेशा तुझ्या आगमनाची दखल घेत तरी नगरपरिषदेचे सत्ताधीश जागे होतील ही आशाही फोल ठरली. आता श्रीगणेशा तूच ही दुर्दशा थांबव व मुळात सुंदर असलेली रत्नागिरी विकासाच्या मार्गावर गतिमान व्हावी, अकार्यक्षमतेच्या खड्ड्यांमध्ये निर्माण झालेल्या चिखलातून सुंदर कमळ फुले उगवावीत. शहरवासीयांना चांगले रस्ते, मुबलक पाणी, स्वच्छ राहील अशी ड्रेनेज सिस्टिम, निश्चित धोरणे ठरवून चालणाऱ्या दर्जेदार मराठी शाळा, स्वच्छ गतीमान प्रशासन अपेक्षित आहे. दयाळू होऊन हे गणेशा रत्नागिरी शहराला कार्यक्षम नवे कारभारी देऊन शहर सुंदर बनवण्याचे वरदान दे.  अशी प्रार्थना ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा