Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राखणदारांनीच काँग्रेसची जमीन हडपली - नाना पटोले


राखणदारांनीच काँग्रेसची जमीन हडपली

 

राखणदारांनीच काँग्रेसची जमीन हडपली



नाना पटोले यांचा शरद पवारांवर पलटवार


 काँग्रेस हा जमीनदारांचा पक्ष नाही, पण काँग्रेसने ज्यांना जमीन राखायला दिली होती, त्यांनीच ती जमीन चोरली, दरोडा घातला, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. ते शुक्रवारी नागपुरात एका वृत्तवाहिनीशी त्यांच्या निवासस्थानी बोलत होते.

पवार यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेसची अवस्था ही जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार एकेकाळी हे शिवार सगळे हिरवेगार होते, असे सांगतो. तशीच काहीशी अवस्था काँग्रेसची झाली आहे, असे विधान केले होते. त्यावर एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर पटोले यांनी पवारांना टोला लगावला.

पटोले म्हणाले, ‘‘पवार साहेब मोठे आहेत. त्यांच्याबद्दल फार काही बोलायचे नाही, असेच ठरले आहे. काँग्रेस पक्षावर त्यांनी प्रतिक्रिया एका ठिकाणी दिली आहे. खरे तर काँग्रेसने अनेक लोकांना जमीन राखायला दिली होती. जमीन राखणाऱ्या लोकांनीच ती जमीन चोरली, दरोडा घातला. त्यामुळे आज काँग्रेसची ही स्थिती झाली असावी असे त्यांचे मत असेल. पण, २०२४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा पंतप्रधान बनेल हे निश्चित. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांचे सरकार हा देश विकायला निघाले आहेत. त्यावर लोकांमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्यावरून आपण सांगू शकतो. भाजपला पर्याय काँग्रेसच आहे. हे सामान्य जनतेला लक्षात आले आहे. तेव्हा कोणाला काय बोलायचे आहे ते बोलू द्या. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. पण, मला असे वाटते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या जाऊ नये. असे मोठय़ा व्यक्तिमत्त्वाला आम्ही लहान व्यक्ती सांगू शकतो, असेही पटोले म्हणाले. काँग्रेसने कधीही जमीनदारी केलेली नाही. हा काही जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसने ज्या लोकांना ‘पॉवर’ दिली त्याच लोकांनी काँग्रेसचा घात केला. असे आपल्याल्या बघावयास मिळते. सामान्य जनता आजही काँग्रेससोबत आहे. भाजपला एकमेव पर्याय काँग्रेस पक्ष आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील अशा प्रकारे प्रतिक्रिया देऊन काँग्रेसच्या नेतृत्वाच्या खच्चीकरणाचा प्रयत्न केला जातो आहे. हे आता कदापि कोणी मान्य करीत नाही. काँग्रेसचे नेतृत्वच २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.

.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा