Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

दोन्ही डोस घेऊनही केईएम रुग्णालयातल्या २२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण; महापौर पेडणेकर म्हणतात, …


दोन्ही डोस घेऊनही केईएम रुग्णालयातल्या २२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण; महापौर पेडणेकर म्हणतात, …

मुंबईतल्या केईएम रुग्णालय आणि सेठ जी.एस वैद्यकीय महाविद्यालयातल्या २२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. चिंतेची बाब अशी आहे की, या विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या. क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे करोनाचा प्रसार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याविषयी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना पेडणेकर यांनी सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पेडणेकर म्हणाल्या, वेगवेगळी महाविद्यालये आणि केईएम रुग्णालयाचे २२ असे मिळून एकूण २९ करोनाबाधित आहेत. मला आत्ताच कळालं की, या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. आपले मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री सातत्याने सांगत आहेत की, लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क काढू नका, हेच संरक्षण आहे. काही विद्यार्थ्यांना थोडा त्रास जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 त्या पुढे म्हणाल्या, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा भरवल्यामुळे निष्काळजीपणा झाला असू शकतो. त्यामुळे त्यांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे काहीही झालं तरी मास्क असायलाच हवा. करोना आजही संपलेला नाही. काळजी न करता काळजी घेतली पाहिजे. ही घटना काळजी करण्यासारखी नाही. सौम्य लक्षणं असलेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा