Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भलंमोठं जहाज; अखेर काही तासांनी गूढ उकलले!


guhagar


गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भलंमोठं जहाज; अखेर काही तासांनी गूढ उकलले!


  • समुद्रकिनाऱ्याजवळ एक भरकटलेलं जहाज आढळल्याने गूढ
  • जहाजाची लांबी जवळपास १५० फूट

रत्नागिरी:तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ एक भरकटलेलं जहाज आढळल्याने सायंकाळपासून गूढ निर्माण झालं होतं. या जहाजाची लांबी जवळपास १५० फूट इतकी आहे. या जहाजाबाबत रत्नागिरी जिल्हा मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी संजय ओगलमोगले यांनी माहिती दिली आहे.


'हे जहाज 'एल अँड टी' कंपनीचं आहे. आरजीपीएल (वीज निर्मिती करणारी कंपनी) कंपनीशी संबंधित असल्याने यामध्ये कोणतीही हानीकारक वस्तू अथवा कर्मचारी नाहीत. ते मनुष्य विरहीत आहे. केवळ कामाचे सामान ठेवण्यासाठी हे जहाज आहे,'अशी माहिती संजय ओगलमोगले यांनी दिली आहे.

घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसून बांधलेला दोरखंड तुटल्याने ते जहाज किनाऱ्याजवळ आलं आहे, असं स्पष्टीकरणही ओगलमोगले यांनी दिलं आहे. समुद्रातील वारा आणि हवामान बदल हे लक्षात घेऊन संबंधित कंपनीकडून ते जहाज योग्य ठिकाणी हलवलं जाईल, तशा सूचना दिल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा