Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शिवणे खुर्द जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजीव वडके यांना पंचायत समिती शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बढती

 


शिवणे खुर्द जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजीव वडके यांना पंचायत समिती शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बढती

रत्नागिरी प्रतिनिधी:-

शिवणे खुर्द गाव माझा स्वत:चा झाला आहे. इथे खुप चांगल्या गोष्टी शिकायला, अनुभवायला मिळाल्या. ही शाळा, इथली मुले उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. या शाळेचा भौतिक विकास आणि गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी माझ्या परिने शक्य तेवढे नक्किच प्रयत्न करेन. असे प्रतिपादन शिवणे खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजीव वडके यांनी व्यक्त केले. 

राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजीव वडके यांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून राजापूर पंचायत समिती शिक्षण विभागात बढती मिळाली. त्याबद्दल शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवणे खुर्द गावाच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने संजीव वडके यांना पुष्पगुच्छ व आठवण भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमावेळी सरपंच दिलीप आरेकर, उपसरपंच सौ. प्रतिक्षा पवार, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश मराठे, सदस्या संजना गोर्ले, माजी सरपंच भालचंद्र गार्डी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य गणेश गोठणकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रशांत घाणेकर, सदस्य अंकुश आरेकर, सुभाष गोर्ले, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. प्रिया आरेकर, अंगणवाडी सेविका श्रीम नारकर,  अंगणवाडी मदतनीस सौ.गोर्ले, माता पालक संघ उपाध्यक्षा सौ. मानसी बोळे, सौ पल्लवी आरेकर, सौ दर्शना घाडी, सौ. प्रतिक्षा गोर्ले, माजी विद्यार्थी उज्ज्वल गोर्ले, नितेश आंबेलकर, अविनाश ठुकरुल, राजेश गार्डी,  जयदीप घाडी, संदीप दसुरी, अमोल बोळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बाणे, शिक्षक श्री पाटील, श्री वाघमारे आदींसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

..................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा