Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

                               

                                 काव्यपुष्प


..प्रभा..

पसरले किरणांचे तेज

आल्या उजळून दिशा,

मोहरले कण क्षण सारे

झाल्या पल्लवित आशा.

..नखाते ज्ञानेश्वर..

      .परभणी.

---------------------------------------

हिरवी सृष्टी

हिरवी सृष्टी

नववधू समान

प्रगती छान


रंगीबिरंगी

फुलांचे संमेलन

मनुजा धन


निर्मळ झरा

वाहतो झुळझुळ

मनाची धूळ


सौ उषा राऊत

 *शब्दगंध..८

-----------------------------------------------

ज्ञान 

सूक्ष्म निरीक्षण जितके

तितकी समजूत अधिक

सखोल विचार करुन

ज्ञान प्राप्त होई सुखकारक 


✍️सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

----------------------------------------------

एक आई अशी ही...


एक आई अशी ही

वयाने वाढलेली

पण मनाने अजूनही 

भोळी भाबळी सानुली....


एकच आवड तिलाही

इतर स्त्रिसारखी आई होण्याची

मनाशी एकच इच्छा धरून

संघर्ष करते बाळ जन्म देण्याची..


तिचे एकच म्हणणे की

निसर्गाने दिलेले वरदान

दिले संपूर्ण नारी जातीला

मग हिरावला का? माझा मान


अजूनही जिवंत आहे 

माझा शरीरात मातृत्वाचं अंग

वय वाढले म्हणून काय झालं

मनसोक्त खेळीन  मी बाळा संग


हे  विधात्या ? हे निसर्गा

कर तू माझ्यात  बदल काही

होईन मी एका बाळाची आई

सांगेन समाजाला मीही वांझोटी नाही....


खुप सहन केले आज पर्यंत

जीव घेण्या संघर्ष खूप सोसले

बेगडी मुखवटे या समाजाचे

लिहितांना ही नयनी अश्रू दाटले


संगिता रामटेके गडचिरोली

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा