Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin eकाव्यपुष्प

निसर्ग

रम्य निसर्ग

जीवना सुखावतो

मनी वाहतो

जन्मोजन्मी

लाभते साथ सर्वा

साज हिरवा

परिवर्तन

असे सृष्टी नियम

मंगलमय

सौ उषा राऊत

---------------------

 आँखो में मुलाकात


आओ चलो  अनकही  बातें करतें हैं।

बंध  आँखों में   मुलाकात  करतें   हैं।


जहाँ से  अधूरी  रहगई   थी  वही  से 

हमारी कहानी  फिर से शुरू करते हैं।


बिना कहे  बिना  सुनें   एक  दूजे  के

भाव को  कविताओं  में बदल देते हैं।


प्यार के बंधन में बंध जाते है फिर से

एक  किताब मै दोंनो कैद हो जाते हैं।


बिखरे पलो को समेट कर ख्वाबों के 

किनारे हम अपनी ज़िंदगी बिताते हैं।


मोहब्बत  की  मोहर  लगाकर  दोंनो 

हमेंशा  के  लिए  अमर  हो  जाते हैं।


    नीक राजपूत

   9898693535

------------------------------- 

सोन किरणे

मनमोहक

दृष्य आसमंतात

हर्ष उरात

सोन किरणे

धरणीवर आली

पिवळी झाली

दिशादिशात

मोद भरला सारा

खुले पसारा


सौ उषा राऊत

--------------------

 उपकाराची परतफेड

ऋणात राहीन मी

आई बाबांचे  उपकार मजवर

विसरू शकत  नाही कधीच

लाख मोलाचा जन्म लाभला

मानवाचा फक्त तुमच्या मुळेच


बाळ हट्ट, सारा तुम्ही पुरविला

स्वाभिमान जागविला मनी छान

तळ हाताच्या फोड्या प्रमाने

जपले  मज, तुम्ही  फुला समान


जीवनात वाट चुकली असता

कान उघडणी ,केली वेळीच

अकुशल जाता मार्गाने आई

दिला मार, वळ येई पर्यंत आधीच


फिटणार नाही कधी उपकार

तू जळली काळजीत अखेर पर्यंत

मला घडविण्यास झटकी सारखी

मी ऋणात राहीन तुझ्याच मरे पर्यंत


 संगिता वाल्मीक रामटेके गडचिरोली

मो.९४२३६०४१४०

-----------------------

  आजची  चारोळी

 तिच्या काडी काडी जोडण्याने

 संसाराचा मळा फुलतो

 नवऱ्याच्या कर्तृत्वावर

 तिच्या सुखाचा झुला झुलतो .


सौ . हेमा जाधव, सातारा

-----------------------

पितृपक्ष ....

भाद्रपदमास संपताच 

असे कावळ्यांचा सण 

म्हणे असे पितृपंधरवडा 

देतसे पितरांना दान 


ज्यानी जगात आणले 

त्यांचे कृतज्ञपणे करू पूजन 

ही भावना किती सुंदर 

अविनाशी आत्माचा करू सन्मान


 गतकाळाला देत उजळा 

घरात पितर घाली जेवू 

वारसा संस्कार जपत  

घराण्याचे नाव लौकिक ठेवू 


पिंडरुपी पूजन करुन

आठवू दिवंगत पूर्वजांना

वरदान लाभते पितरांचे

कर्म करावे त्यांना स्मरताना

✍️सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

----------------------------

शब्दगंध..

धन संपत्ती असेल तरी 

मन अहंकारी नसावे

चांगुलपणा माणसातील शोधून 

मन नेहमीच समाधानी ठेवावे 


सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

----------------------------


माझी अडाणी आई...

माझी अडाणी गं आई

उणे जीवन कंठीते

संसाराचा गाडा एकी

 निरंतर चालविते


स्वतः उपाशी राहुनी

घास लेकरा भरवी

नाही अंतरी परीघ

तरी तिचा,भास होई


आता तरी परतून

फिर माघारी एकदा

चित्त माझे नसे जगी 

याद जीव घेई सदा


हरलोय या ब्रह्मांडी

काव्य तुझे गं रचीले

उभ्या हयाती माझिया

गुरू तुलाच वंदिले...


 विजय वैशाली दत्ताराम पराडकर - आण्णा

-------------------------


माया तुझी अनमोल


माया तुझी अनमोल 

तळ हाती फोडा सम

जपणार आनंदात

सारे सोडूनिया काम


कोणी नाही करणार

आई निःस्वार्थ मनानं

जरी अडाणी असेल

लाड करते मायेनं


राब राबून उन्हात

सुख देई लेकरास

आई उपासी राहुनी

जेऊ घालते पोटास


जाई काम करण्यास

लक्ष तिचे पोरापाशी

घार भिर भिरे जशी

पान्हा  दाबते छातीशी


संगीता रामटेके गडचिरोली

-------------------------

 विषय:समाजाचं देणं

शीर्षक:- कर्तव्यास जाग

जाग मित्रा

जाग आता

नको झोडू

फोल्या बाता


आता तरी

कर कार्य

तन मन

सहकार्य


समाजाचं

देणं आहे

काही तरी

करू पाहे


वसा घेणं

थोडा तरी

कल्याणाचा

 हितकारी


ठेव जरा

थोडे भान 

माणुसकी

समाधान


देणं आहे

सामाजिक

भारताच्या

नागरिक


सीमेवर

लढशिल

एकात्मता

राखशिल


संगिता वाल्मीक रामटेके गडचिरोली

--------------------------

...लेक चालली सासरला....


 आठवण तुझ्या प्रेमाची 

राणी साठविली मनात

आज चालली लेक माझी 

सासरच्या बनात

     दिसे डोळ्यासमोर 

    अजूनी लहान छकुली 

     कळलेच नाही मला गं

     कधी मोठी झाली बाहुली

 घरभर पसरलेला 

तुझा भातुकलीचा खेळ

आठवे आज मला 

तुझ्यासोबत घालवलेला वेळ

    आईच्या पदरात

     लपलेली माझी परी

      सोडुनिया आज आईला 

      निघाली बघा सासरी 

कधी कधी होतसे 

तूच माझी आई 

आज माझ्या राणी विना 

घर सुनं सुनं होई

    भावाबहिणींची काळजी 

    घेई आई सारखी 

    सोडुनी आज माहेर 

    वाटे, झाली का परकी 

चालली लेक सासरी 

आईच्या पडते गळा 

डोळेही पाणावले माझे 

पाहूनी पाठवणीचा सोहळा 

    डोळ्यातील आसवांना 

    सांगा कुठे मी लपवु 

     हसतहसत लेकीला 

     कशी सासरी पाठवू


 सौ.मेहमूदा शेख.

--------------------------         

किमया

निसर्ग शोभा

मनोमनी ठसते

करी वसते


रंगीबेरंगी 

किमया निसर्गाची

पुष्टी स्वर्गाची


हिरवे वस्त्रे

मखमली तृणांची

तृप्ती मनाची


सौ उषा राऊत

-------------------------

 नाते भगवंताशी


भेटा भगवंता// देवाचिया द्वारी

मंदिर गाभारी//विटेवर//


सोन्याची पंढरी//दुमदुमलेली

आस लागलेली//पाहण्याची


आम्हासाठी देवा//भक्ती हेच कर्म

वैष्णवांचा धर्म//जीवनात


विष्णुमय जग//प्रकाश कुंडल

भक्तीचा महल//सर्वव्यापी


रोजचे पठण//मनस्वी साधना

नित्य आराधना//तुझ्यापाशी


नामस्मरणाने//तप मनःशांती

राहूनिया चित्ती//आनंदित


नको हेवदाव//ठेव वचनात

वाढो आपणात//बंधुभाव


- नयन धारणकर

--------------------------

मना हैं.

दौड है ज़िंदगी 

और रुकना मना हैं...


बहाव तेज है इरादों का..

और थामना मना हैं..!!!


राजेंद्र पोतदार. नेवासा

-------------------------

 बेटी ऐसी होती हैं।


जो न बोलें ही समजे

मॉं बाप के मन की बात।

जिनके खयालो में होते हैं

उनके सपने  दिनरात।

दिये के लौ जैसी,

    हरदम संजोडती है।

......बेटी ऐसी होती हैं।।


जब मॉं रोई तो

बेटी होती है आंचल।

बाप की हिम्मत बढानेको

सिना ताने खडी हरपलं।

किरण उम्मीद की ओ,

शान घर की होती हैं।

......बेटी ऐसी होती हैं।।


उपरवाले ने साकारा

सुंदर सा ख्वाब वो हैं।

मनमे उठने वाले

हर सवाल का जवाब वो हैं।

जहा जाती हैं वो

फूल सी महक छोड जाती है

    ......बेटी ऐसी होती हैं।।


उसको बोझ न समझो

ये खुदगर्ज दुनियावालो।

खुदाकी अमानत समझकर

उसको सवारो संभालो।

वो अपने काम से ,

नया नाम जोड जाती हैं।

    .....बेटी ऐसी होती हैं।

   सौ संगीता बोरसे

---------------------------

         आजची   चारोळी


    कधी कधी आपण शहाणी माणसंही

    अगदी वेडयासारखं वागतो

    रुढी . परंपरेच्या नावाखाली

    देवीपुढे बकरं कापतो.

    सौ हेमा जाधव, सातारा


--------------------------

जीवनगाणे

घडून गेले जे काल काही

आज पुन्हा घडणार नाही

क्षणाक्षणाला क्षण बदले हा

क्षण जो गेला, पुन्हा तो नाही 


उगाच रचशी पूल असा का

क्षणा-क्षणांना सांधणारा

वर्तमान रे हरवून जाईल

भूत-भविष्या बांधणारा 


काल हवे ते आज नकोसे

‘ सुख हरपले’ दुःख वाटते

बदलत जाणे धर्म क्षणांचा

व्यर्थ मनी का काहूर दाटते 


तू बदलसी, मी बदलतो

बदलत जाती ती,तो,सारे

उदासी का गेल्या क्षणांची

बघ डहाळीवर नवे फुलोरे


उगाच का रे शिणसी वाया

मनात का ती आशा वेडी

नव्या क्षणांना नवी नव्हाळी

नवीच असते तयात गोडी


जीवनात या सारे प्रवाही

क्षणाक्षणाचे आगळे देणे 

क्षणाक्षणाचा सूर वेगळा

अविट असते जीवन गाणे  

      आनंदहरी

    ८२७५१७८०९९

-----------------------------------

  चैतन्य

सुरम्य सृष्टी

सूर्य तेजात न्हाली

अवतरली


मुग्ध मधुर

स्वर पक्षांचे कानी

चैतन्य मनी


फुले सुगंधी

झाडा वेलीवरती

मोह दावती


सौ उषा राऊत

--------------------------------

आजची  चारोळी


शिकलेली सारीच माणसं

सुशिक्षित नसतात ,

कधी कधी त्यांच्यापेक्षा

अडाणीच बरी वाटतात.

सौ. हेमा जाधव, सातारा

---------------------------

 ....बळीराजा....

बळीराजाला पुसा,
काळ्या आईच मोल 
रात्रंदिवस करतो, 
कष्टाने डोळं ओलं......

 सौ.मेहमूदा शेख. ( देहुगाव )
-------------------------

 लेक/ मुलगी /बेटी 

प्रत्येक घरात मुलगी असावी 
लक्ष्मीच्या रूपाने घरभर फिरावी 

खोडकर, खटाळ अशी असावी 
पण प्रत्येकाचीच लाडकी असावी

अशी लेक उमलताना बघावी  
नाजुक नखरे करताना मिळावी

गालातल्यागालात हसणारी
भावनेच्या भरातमिठी मारणारी

बाबा लवकर आला नाही 
म्हणून रुसणारी
आई बाबांची मैत्रीण होणारी

बापाला मुलींचा लळा असतो
कन्यादान करुन भाग्यवान होतो

 सौ मधुरा कर्वे.( भावगंधा )
पुणे.


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा