Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

साठ वर्षांवरील ५३ लाखांवर भारतीयांना अल्झायमर्स

 


साठ वर्षांवरील ५३ लाखांवर भारतीयांना अल्झायमर्स


काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव
जागतिक अल्झायमर्स  जनजागृती दिवस

पुणे : भारतात साठ वर्षांवरील वयोगटातील सुमारे ५३ लाख नागरिक अल्झायमर्सचा सामना करत आहेत. साठ वर्षांवरील नागरिकांमध्ये दिसणारे वर्तन बदल, विस्मृती अशा बाबींकडे वयोमानानुसार स्वाभाविक बाब म्हणून दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेतला असता अल्झायमर्सच्या वाढीचा वेग कमी करणे शक्य आहे. या रुग्णांच्या सांभाळासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मदत यंत्रणा उभ्या करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर्स जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. ‘अल्झायमर्स अ‍ॅण्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया’ या संघटनेच्या माहितीप्रमाणे भारतातील साठ वर्षांवरील वयोगटात सुमारे ५३ लाख नागरिकांना अल्झायमर्सचे निदान झाले आहे. २०३० पर्यंत यात सुमारे २० लाखांची वाढ दिसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत साठ वर्षांवरील दर २७ नागरिकांमागे एक जण अल्झायमर्सचा सामना करत आहे. ग्रामीण भागातही अल्झायमर्सचे प्रमाण लक्षणीय आहे, मात्र जागरूकतेअभावी आजार गंभीर होईपर्यंत ते वैद्यकीय उपचारांपर्यंत पोहोचत नाहीत. अल्झायमर्स रुग्णाचा सांभाळ करणे अवघड असते. त्यासाठी कायमस्वरूपी मदत मिळाली तर कु टुंबासाठी तो दिलासा ठरतो, मात्र प्रशिक्षित मनुष्यबळ (के अरटेकर) मिळणे ही मोठी समस्या आहे.

मानसोपचारतज्ज्ञ आणि अल्झायमरविषयक जागृती पुनर्वसन केंद्राचे संस्थापक डॉ. अमर शिंदे म्हणाले, की अल्झायमर्ससारखा विकार मेंदूशी संबंधित आहे, मात्र त्याची लक्षणे ही मानसिक आजाराची आहेत. त्यामुळे आजार ओळखून उपचार सुरू करणे आवश्यक आहे. कु टुंबीयांचे समुपदेशन, रुग्णाचा सांभाळ करण्यासाठी कु टुंबाला प्रशिक्षित मदत उपलब्ध करून देणे या बाबीही अल्झायमर्स या आजारामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

अल्झायमर्सची लक्षणे

’विस्मरण, वेळ-काळाचे

आकलन न होणे.

’घर, इमारत अशा नेहमीच्या परिचयाच्या ठिकाणीही गोंधळ उडत असल्यास त्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

’सतत संभ्रम होणे, संवाद साधण्यात अडचण जाणवणे.

’नावे, व्यक्ती, नातेसंबंध याबाबत विस्मरण, अलिप्तता.  रुग्ण व्यक्तीचे परावलंबित्व वाढणे.

काय काळजी घ्यावी?

शक्यतो रुग्ण व्यक्तीला एकटे सोडू नये. रुग्णाबरोबर सतत संवाद ठेवणे उपयुक्त ठरते.

रुग्ण घराबाहेर जात असल्यास नाव, पत्ता, संपर्क  यांची माहिती असलेला कागद सोबत द्यावा.

औषधांच्या वेळा सांभाळणे आवश्यक. औषधे घेण्याचे विस्मरण किं वा परत घेतली जाण्याचा धोका असल्याने औषधांचे वेळापत्रक कु टुंबातील इतर व्यक्तीने सांभाळावे.

................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा