
नारीशक्ती: भारतात आकार घेतोय महिलांकडून चालवणार जाणारा जगातील सर्वात मोठा कारखाना
या आस्थापनेमध्ये काम करण्यासाठी कार्यरत महिलांची पहिली तुकडी देखील तयार झाली आहे.
महिला आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पण तुम्ही विचार केला आहे की फक्त महिलचं एखादा कारखाना पूर्णपणे चालवतील. होय, ते होणार आहे. ओला या इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने म्हटले आहे की, फक्त महिलाच त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी चालवतील. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.
१० हजारांहून अधिक महिलांना रोजगार
ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले की, कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर कारखान्याचे संपूर्ण ऑपरेशन महिला करणार आहेत. यामध्ये १०,००० पेक्षा जास्त महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. त्यांनी ट्विटरवर लिहिले, “स्वावलंबी भारताला आत्मनिर्भर महिलांची गरज आहे! मला हे सांगताना अभिमान वाटतो की ओला फ्यूचरफॅक्टरी पूर्णपणे महिलांनी चालवली जाईल, ज्यामध्ये १०,००० पेक्षा जास्त महिला मोठ्या प्रमाणावर काम करतील! हा फक्त महिला कामगारांचा जगातील सर्वात मोठा कारखाना असेल.”
महिलांच्या पहिल्या तुकडीची नियुक्ती झाली
अग्रवाल यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला ज्यामध्ये या आस्थापनेमध्ये काम करण्यासाठी कार्यरत महिलांची पहिली तुकडी दाखवण्यात आलीआहे. त्यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की कंपनीने या आठवड्यात पहिल्या बॅचचे स्वागत केले आहे आणि असे म्हटले आहे की, “पूर्ण क्षमतेने, फ्यूचर फॅक्टरी १०,००० पेक्षा जास्त महिलांना रोजगार देईल, ज्यामुळे ती केवळ महिला कामगार आणि जागतिक स्तरावर जगातील सर्वात मोठी असेल. ही केवळ महिला कामगारांसह ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल.”
सर्व प्रकारच्या कामाशी संबंधित आर्थिक संधी
ते म्हणाले की ओला अधिक सर्वसमावेशक कार्यबल तयार करण्यासाठी आणि महिलांसाठी सर्व प्रकारच्या कामाशी संबंधित आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेत आहे. अग्रवाल म्हणाले, कंपनीने उत्पादन कौशल्यांच्या मुख्य क्षेत्रांमध्ये महिला कामगारांना प्रशिक्षण आणि अतिरिक्त कौशल्ये प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली आहे.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा