Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट; दहशतवादी संघटनांच्या भूमिकेवरून पाकिस्तानला इशारा

Pm modi kamala harris Pak role in terrorism pm modi us tour


पंतप्रधान मोदींनी घेतली कमला हॅरिस यांची भेट; दहशतवादी संघटनांच्या भूमिकेवरून पाकिस्तानला इशारा


पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय भेटींच्या मालिकेतील दुसरी बैठक अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी करोनाच्या महामारीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खाजगीत चर्चा झाली आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीला उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शुक्रवारी झालेल्या पहिल्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि देशाला दहशतवादी गटांचे समर्थन थांबवण्यास सांगितले आहे. कमला हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. हॅरिस यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही. बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोविड साथीच्या काळात कमला हॅरिस यांच्या मदतीची आठवण करून दिली. “उपराष्ट्रपती झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. भारत कोविडशी लढत असताना एकदा संभाषण झाले होते. त्यावेळी कमला हॅरिस यांचे एकतेच शब्द मला आठवले. अमेरिकन सरकार आणि कंपन्या आणि परदेशातील भारतीय समुदाय कोविड महामारीशी अत्यंत कठीण लढाईत खूप मदत करत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि हॅरिस यांनी स्वतः अशा वेळी पदभार स्वीकारला जेव्हा संपूर्ण जगाला एक अतिशय कठीण आव्हान भेडसावत होते आणि अतिशय कमी कालावधीत त्यांनी कोविड किंवा हवामान बदलांसारख्या आपत्तींसोबत लढा देत यश मिळवले,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेला गेलेले परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी भविष्यातील सहकार्याच्या क्षेत्रासह अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य या विषयांवर  चर्चा केल्याचे सांगतले.

“अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सीमेपलीकडील दहशतवादाबाबत पंतप्रधान मोदींशी सहमती दर्शवली आणि भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरल्याचे मान्य केले. हॅरिस यांनी अशा दहशतवादी गटांच्या पाकिस्तानच्या पाठिंब्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेवरही सहमती दर्शवली. पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही,” असे हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले.

कमला हॅरिस यांनी भारतात येण्याचे निमंत्रण

भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही आहेत असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. “आमची मूल्ये समान आहेत आणि आमचे सहकार्य हळूहळू वाढत आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून तुमची निवड ही एक अतिशय महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. तुम्ही जगभरातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात आणि मला खात्री आहे की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमचे द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील. भारताचे लोक तुमचे स्वागत करण्याची वाट पाहत आहेत. मी तुम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण देतो,” असे पंतप्रधानांनी म्हटले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींसोबत पंतप्रधान मोदींचा हा पहिला औपचारिक संवाद होता. याआधी जूनमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवर चर्चा झाली. हॅरिस यांनी कोविड साथीच्या काळात भारताला अमेरिकन लस देण्यासाठी प्राधान्य दिले होते.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा