Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महाज्योतीची चाळणी परीक्षा केवळ तीन दिवसांच्या सूचनेवर


महाज्योतीची चाळणी परीक्षा केवळ तीन दिवसांच्या सूचनेवर

महाज्योतीची चाळणी परीक्षा केवळ तीन दिवसांच्या सूचनेवर



अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची भीती

 महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन व प्रशिक्षण संस्थे (महाज्योती) मार्फत यूपीएससी व एमपीएससी ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेतली जात आहे. परंतु, ही परीक्षा तीन दिवसांच्या अल्प सूचेनवर घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ होणार असून अभ्यासासाठी दिल्ली आणि इतर ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना  परीक्षेपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे.

महाज्योतीने इच्छुक उमेदवारांकडून नि:शुल्क प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज केले. उमेदवारांची निवड करण्यासाठी येत्या १३ सप्टेंबर रोजी छाननी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याची सूचना ९ सप्टेंबरला ई-मेलद्वारे  देण्यात आली.  तीन दिवसात विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणाहून येऊन परीक्षा द्यायची आहे. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा कालावधी द्यावा लागतो. महाराष्ट्रातील सुमारे २०० विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत वास्तव्यास आहेत आणि त्यांची नागरी सेवा पूर्व परीक्षा १० ऑक्टोबरला आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना तातडीने येऊन परीक्षा देणे धावपळीचे होणार आहे.  यात त्यांचा तीन ते चार दिवसांच्या अभ्यासाचे नुकसानही होणार आहे. त्यामुळे महाज्योतीने चाळणी परीक्षा  १० ऑक्टोबरनंतर घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.  २०२२ ची पूर्व परीक्षा ५ जून २०२२ मध्ये घोषित झाली आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खाजगी प्रशिक्षण किंवा त्यापद्धतीने अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे महाज्योतीने नि:शुल्क प्रशिक्षणाची २०२२ साठीची नवीन बॅच सुरू करणे योग्य नाही. त्याऐवजी २०२३ साठी नवीन बॅच व २०२१ व २०२२ साठी मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देणे योग्य ठरेल, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक  प्रदीपकुमार डांगे म्हणाले,  नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक आयटी कंपनी एनएसई-आयटी ही परीक्षा घेत आहे. ही कंपनी एमएच-सीईटी आणि जेईई परीक्षा घेत आहे. एमएच-सीईटी परीक्षा झाल्याशिवाय प्लॅटफार्म उपलब्ध करून देऊ शकत नाही, असे या कंपनीने महाज्योतीला कळवले. या परीक्षेचे वेळापत्रक अंतिम झाले आहे. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही परीक्षा आहे. आता त्यांनी १३ आणि १४ सप्टेंबरला परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली. आपण जी चाळणी परीक्षा घेत आहोत, ती २०२२ च्या एमपीएससी आणि यूपीएससीसाठी इच्छुक उमेदवारांकरिता आहे.  त्यासाठी ११ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. पण, परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने परीक्षा घेणे शक्य नसल्याचे सांगितल्याने विलंब झाला. अखेर एमएच-सीईटीच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले आणि त्यांनी १३ आणि १४ सप्टेंबरला महाज्योतीची परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली. विद्यार्थ्यांचा पुन्हा अधिक वेळ जाऊ नये आणि प्रशिक्षणाला विलंब होऊ नये म्हणून अल्प कालावधीच्या सूचनेत परीक्षा घेणे भाग पडले, असे डांगे यांनी सांगितले.

दिल्लीतील विद्यार्थ्यांचे काय?

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी करीत आहेत. महाज्योतीने दिल्लीत परीक्षा केंद्र (ऑनलाईन) दिलेले नाही. अशावेळी त्यांना केवळ तीन दिवसांवर असलेली चाळणी परीक्षा देणे अशक्य आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याची  मागणी दिल्लीच्या राजेंद्रनगर येथे राहून परीक्षा देत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून केली आहे.

.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा