Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

वायु प्रदूषणाबाबतच्या जागतिक निकषांमध्ये बदल


वायु प्रदूषणाबाबतच्या जागतिक निकषांमध्ये बदल


वायु प्रदूषणाबाबतच्या जागतिक निकषांमध्ये बदल

मुंबई: जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणत्तेविषयी २००५ साली जाहीर के लेले निकष आता अपुरे पडू लागले असून प्रदूषणाचे वाढत चाललेले प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी संघटनेने नवी मार्गदर्शक  तत्त्वे जाहीर के ली आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी घातक प्रदूषकांचे आदर्श प्रमाण कमी करत हवा गुणवत्तेचे नवे निकष या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुचवण्यात आले आहेत. हवेतील घातक सूक्ष्मकण (पार्टिक्युलेट मॅटर – पीएम), ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साइड या प्रदूषकांसाठी संघटनेने नवी मर्यादा निश्चित के ली आहे. १० मायक्रॉन्स आणि २.५ मायक्रॉन्स इतका आणि त्यापेक्षा कमी व्यास असलेले घातक सूक्ष्मकण (पीएम १० आणि पीएम २.५) यांच्याशी संबंधित आरोग्यविषयक जोखीम ही प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्याशी निगडीत आहे.

पीएम २.५ आणि पीएम १० हे दोन्ही घातक सूक्ष्मकण फु प्फु सामध्ये खोलवर प्रवेश करू शकतात. यापैकी पीएम २.५मध्ये रक्तप्रवाहात प्रवेश करण्याचीही क्षमता असते. याचा प्राथमिक परिणाम हृदय, रक्तवाहिन्या व श्वसनावर होतो. त्यानंतर इतर अवयवांवरही परिणाम होतो. वाहतूक, ऊ र्जा, घरगुती कामे, उद्योग, शेती या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या ज्वलनातून पीएम निर्माण होतात व ते कर्क रोगासही अनुकू ल असतात. हवा गुणवत्ता मर्यादा ठरवण्याइतपत पुरावे नसलेल्या पीएमच्या (उदा. – ब्लॅक कार्बन/एलिमेंटल कार्बन, अतिसूक्ष्म कण, धूळ आणि वाळूतून निर्माण होणारे कण) व्यवस्थापनासाठीही नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही उपाय सुचवण्यात आले आहेत. हे उपाय सर्वप्रकारच्या स्थितीत जागतिक स्तरावर घरगुती वातावरणाला आणि बा’ वातावरणालाही लागू होतात.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा