Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर शहरातील वासुकाका जोशी पूल गणेश विसर्जन घाट विकसित करण्याचा मानस: नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे

 




राजापूर शहरातील वासुकाका जोशी पूल गणेश विसर्जन घाट विकसित करण्याचा मानस: नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर शहरातील भटाळी परिसरातील वासुकाका जोशी पूलानजिक असलेल्या गणेश विसर्जन घाटाचा परिसर विकसित व सुशोभिकरण करण्याचा मानस असल्याचे मत राजापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे यांनी व्यक्त केला आहे. नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे यांनी नुकतीच या परिसराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत काही नागरिक देखील उपस्थीत होते. भटाळी परिसरातील काहींचे गणपती विसर्जन या गणेश विसर्जन घाटावर होते. तिथे अत्याधुनिक सुविधा असाव्यात अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. यावेळी राजापूर शहरातील मुख्य गणेश विसर्जन घाट ज्या पद्धतीने विकसित करण्यात आला आहे त्या धर्तीवर याही गणेश विसर्जन घाटाचा विकास करण्याचा मानस नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे यांनी यावेळी व्यक्त केला. राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदिपात्राच्या संगमावर असलेल्या गणेश घाटाच्या विकासासाठी तसेच सुशोभिकरणासाठी माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांनी त्यांच्या कार्यकाळात स्थानिक विकास कार्यक्रमातून सुमारे १५ लाखांचा निधी दिला होता. हा गणेश विसर्जन घाट सुशोभित करण्यात आला असून आता याबाबत शहरातील नागरिक नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे व माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांचे आभार मानत आहेत. याच धर्तीवर वासुकाका जोशी पुलाजवळ असलेल्या गणेश घाट विकसित करण्याचा मानस नगराध्यक्ष अ‍ॅड.जमीर खलिफे यांनी व्यक्त केला आहे.

.........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा