Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोणी काम देता का काम?-कलाकारांची व्यथा


कोणी काम देता का काम?

कोणी काम देता का काम? कलाकारांची व्यथा


सलग दुसऱ्या वर्षी उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने सकल कलांचा अधिपती असलेल्या गणेशोत्सवामध्ये कलाकार कार्यक्रमांपासून वंचित राहणार आहेत.

गणेशोत्सवात कलाविष्काराची संधी नसलेल्या कलाकारांची व्यथा


 सलग दुसऱ्या वर्षी उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने सकल कलांचा अधिपती असलेल्या गणेशोत्सवामध्ये कलाकार कार्यक्रमांपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे कोणी काम देता का काम?, अशा शब्दांत कलाकारांनी आपली व्यथा मांडली.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असून गर्दी टाळण्याच्या उद्देशातून सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. लोककलावंत, बँडपथकातील वादक, पडद्यामागील कलाकार, देखाव्यांची सजावट करणारे कलाकार अशा सर्वाची गणेशोत्सव ही वर्षभराच्या कमाईची बेगमी असते. मात्र, करोना प्रादुर्भावाच्या बंधनांमुळे कोणाकडेही काम नसून, कला क्षेत्रातील अनेकांची उपजीविका धोक्यात आली. प्रगत तंत्रज्ञानाशी जुळवून न घेता येणाऱ्या कलाकारांना गणेशोत्सवात काम मिळाले नाही. ‘कोणी काम देता का काम’ असा प्रश्न या कलाकारांना पडला आहे.

सजावटकार संदीप गायकवाड म्हणाले, गणेशोत्सवामध्ये मी गणेश मंडळांचे देखावे, मंदिरांची सजावट, मिरवणुकींचे रथ बनविणे, सोसायटय़ांमधील देखाव्यांची सजावट करतो. माझा व्यवसाय हा उत्सवावर अवलंबून आहे. करोनामुळे सलग दुस?ऱ्या वर्षी काम नसल्याने आता काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर आहे. दोन वर्षांपासून मुलांच्या शाळेचे शुल्क भरता आलेले नाही. दरवर्षी माझ्यासोबत १५ ते २० कलाकार काम करतात. उत्सवामुळे त्यांनाही रोजगार मिळतो. पण, माझ्याकडेच काम नसल्याने त्यांनाही काम देता येणे शक्य झाले नाही.

वादक आपल्या गावी

सुमधुर स्वरांची बरसात करणाऱ्या बँडपथकांच्या मंगलमय वादनाने गणरायाच्या प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या दुसऱ्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये मिरवणूक नसल्याने बँडपथकातील वादकांच्या हातांना कामच नाही. त्यामुळे पथकातील वादक आपापल्या गावी निघून गेले आहेत, असे दरबार ब्रॉस बँडचे संचालक इक्बाल दरबार यांनी सांगितले. पथकातील गायक-वादक कलाकारांना सादरीकरणानुसार एक हजार रुपये ते तीन हजार रुपये मिळतात. मात्र, यंदा वादनासाठी परवानगी नसल्यामुळे बँडपथकांकडे सादरीकरणासाठी विचारणा देखील झालेली नाही. त्यामुळे बँडपथक व्यवसायच अडचणीत आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा