Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सलग ११ व्या वेळी झाली आबलोलीच्या तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड



 सलग ११ व्या वेळी झाली आबलोलीच्या तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड

रत्नागिरी: गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत आबलोलीची आज ग्रामसभा झाली. सभेमध्ये विद्याधर (आप्पा) राजाराम कदम यांनी कोरोना काळात केलेले कार्य तसेच तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष म्हणून गावातील तंटे गावातच मिटविण्याचे केलेले आहे. व आबलोली ग्रामपंचायत निवडणूक विनातंटा कोणतेही राजकारण होऊ न देता सर्व समाज घटकांना सामाऊन घेऊन बिनविरोध करण्याचे काम मागील कित्येक वर्षे ते करत आले आहेत. याबाबत चर्चा करण्यात आली. व या  सर्व उल्लेखनिय कार्याची दखल घेत ग्रामसभेने सलग ११ व्या वेळी तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्ष पदी विद्याधर (आप्पा) राजाराम कदम यांची बिनविरोध एकमताने निवड करीत आबलोली ग्रामपंचायतीचे सरपंच मा. तुकाराम पागडे यांनी सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी सोबत ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले, मिनल कदम, भारती कदम, मुग्धा पागडे, साक्षी रेपाळ व ग्रामसेवक बाबुराव सूर्यवंशी, उद्योजक सुभाष काजरोळकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उल्हास काळे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

............
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा