Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e


काव्यपुष्प शुभगंध.


बाप्पाच्या निरोपाची वेळ झाली 

आज्ञा द्यावी तुझ्या निरोपाची 

पुढच्या वर्षी लवकर ये,म्हणुनी

आठवण येई रिकाम्या मखरेची 


सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

---------------------------------------------

  निसर्ग      

शुभ सकाळ

गंधित दरवळ

आंस प्रबळ


सूर्य केशरी

शाभे क्षितिजावर

दिव्य प्रहर


मनी उल्हास

कानी मंजुळ धून

निसर्ग ऋण


सौ उषा राऊत

-------------------------

 निरोप 

निरोप घटिका येता

पाणावती बघा डोळे 

नका जाऊ बाप्पा वाटे

चालूच असावे सोहळे


बघता बघता समीप

आली निरोपाची वेळ

तुमचा आमचा केवळ 

जमवावा ताळमेळ


जाणार म्हटल्यावर 

पाणी सागराचे आटले

मंगलमूर्ती विसर्जनास

लेकरं ही व्याकुळले


तुमच्याविना कसे

राहवणार या मनास 

मन उधाणलेले होते 

दहा दिवस दर्शनास


वाटले नव्हते दिवस 

इतक्यातच सरतील 

गजानना शिवसुता

निरोप लगेच घेशील


पण थांबली मिरवणूक 

ढोल ताशांचा ही गजर 

अजूनही दिवंगत आहे

कोरोनाचा चालू कहर


खंत याची उत्सव तुमचा

नाही रंगला जल्लोषात 

पुढच्या वर्षी लवकर या 

स्वागत असेल उत्साहात


- नयन धारणकर

--------------------------


स्त्री शक्ती


स्त्रीचा महिमा/ किती मी वर्णावी/

गाऊ मी थोरवी / महिलेची//


प्रत्येक क्षेत्रात/अग्रशी भरारी/

ना येई माघारी/ प्रगतीला//


संघर्ष कुरूनी / मिळविले हक्क/

स्वयं शिध्द चक्क/ होऊनिया//


नारी रूप तिचे/ असती अनेक/

विचारात नेक/ कर्तव्यात//


जिच्या हाती असे/ पाळण्याची दोरी/  

जगाला उधारी/ संत बोल//

 

नारीचा आदर/ करावा सर्वांनी/

नका दडपणी/ बंदिवान//


गेला तो जमाना/ आता नाही मागे/

गर्जूनी ती सांगे/ पुरुषाला//


शिक्षण ती रुपी / हाती तलवार/

सपासप वार/ प्रसंगात//सावित्रीची लेक/रमाईची ब्रिद/

लढण्यात जिद्द/ स्वाभिमान//


शिक्षण असते/वाघिणीचे दूध/

करेल ती युद्ध / विचाराशी//


सांगून गेलेत/बाबा साहेबांने/

स्व कर्तुत्वाने/ राहायला//


सावित्री आईने/अनिष्ट प्रथेला/ज्योतीबा साथीला/ असताना//


संगीता रामटेके गडचिरोली

------------------------------


 पावसाने लावली हजेरी

ओली  झाली अवनी

बळिराजा सुखावला

खुशीचे शेत पिकले जीवनी


संगिता रामटेके

-----------------------------------------


         आजची  चारोळी


     हातभर पोट, जनावरं

    किती सहज भरतात

    वीतभर पोटासाठी माणसं

    आयुष्यभर चिंता कराराण


    सौ हैमा जाधव, सातारा

---------------------------------------------

झाड


आयुष्याच्या रस्त्यावर 

उभ एक झाड भेटते 

गर्द छाया देत देत 

गप्पा गोष्टी करत असते //


पाळमूळ खोल त्याची 

मातीशी या सांगत नात 

जेथे जाईल तेथे तेथे 

पाणी त्याला मिळत असतं //


पानापानावर त्याच्या

पांथस्थाचे नाव असतं 

अंगावर काही जातानाही 

आधाराचा हात देत //


बोलणार ते झाड 

आता चिडीचूप होऊन बसते 

आयुष्याच्या रस्त्यावरच 

चालणे मात्र चालू असते.* //


सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

---------------------------------

 काव्य प्रकार: अश्ठक्ष् री

विषय:- अन्नदाता

 शेतकरी दादा

अख्या जगाचा पोशिंदा

माझा शेतकरी दादा

भर उन्हात राबतो

कष्ट करी रोज सदा


दिनरात कष्ट करी

बांडी फाटकी घालतो

पर्वा जीवांची ना करे 

स्वप्न उद्याचे पाहतो


अन्नदाता बाप माझा

 काढे अर्ध पोटी  दिस

सावकारी कर्जासाठी

घेई झाडाला  हो फास


अन्नदाता बाप माझा

सोनं पिकवी शेतात

स्वप्न उराशी घेऊन

मनी होईल खुशीत


धड अंगावर वस्त्र

नाही पायात चप्पला

कोण समजेल व्यथा

कर्ज बोजाने वाकला


होई उपवर लेक

चिंतातुर अन्नदाता

कसा करावा संसार

सांग देवा मार्ग आता


संगिता वाल्मीक रामटेके

गडचिरोली

मो.९४२३६०४१४०

-------------------------------------------------

विषय: मोबाईल काळाची गरज

तुझे नी माझे जुळले रे सूर

ओढले मोहात, पडले नादात

आता तुझ्या शिवा मज करमेना

तुला नाही एक मिनिट मी सोडत


जग बदलले मीही बदलली

तुझ्या विना रे माझं डोकं चालेना

आजचे हे युग प्रगतीचे युग मग

मी असते तुझ्या मागे पुढे सांगना


तू च माझ्या अंगाखांद्यावर

करतेस वळवळ दिवस रात

तुझ्या संगतीत  मज नाही  भान

अशी कशी रे तुझ्या पडली प्रेमात


जगाच्या पाठीवर तुझेच नाव

लहान मोठ्यांच्या हातात खेळत

घरी राहूनच सारं माहिती होई जग

तुझ्या विना एक मिनिट नाही करमत


तुझी रे आहे काळाची गरज

जेवढा तू चांगला, तेवढाच वाईट

माझे सर्व होते करते घरी बसून

देशाविदेशात तुझेच चाले नेट


तुझे नाव माझे ओठी मोबाईल 

तुझ्या मुळे माझे नाते सारे तुटलेत

तुझ्यात केव्हा अडकलेत समजेना

तू झ्यामुके बातम्या घरी दिसतेत


संगिता रामटेके गडचिरोली

---------------------------------------------------

         

पाऊस सरी

रिमझिम सुंदर

शांती अंतरीं


हसली सृष्टी

मंत्रमुग्ध होऊन

लाभली दृष्टी


सौंदर्य भारी

मनोमनी ठसते

वार्षिक वारी


सौ उषा राऊत

-----------------------------------------


  आजची   चारोळी


       मतलबी  अपेक्षेवर

     प्रेम कधी जगत नाही

    स्वार्थाच्या वृक्षवेलीला

   प्रीतफुले लागत नाहीत

    सौ. हेमा जाधव, सातारा

-------------------------------

   निरोप गणपती बाप्पाना....! 

  अनंत चतुर्दशी

निरोप गणपती बाप्पा देतो

पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो....१


सहवास तुमचा दहा दिवसाचा मनी रेंगाळतो

दररोज होणारी ती मंगलमय आरती आठवितो.....२


आराधना केली मनोभावाने

गणपती बाप्पाची

हाकालपट्टी करावी करोना महामारीची...३


आशिर्वीद देती श्रीगणेश हसतमुखी

प्रसंन्नतेने ठेऊनी डोईवरी हित म्हणती व्हिवे सुखी...४


मंगलमूर्ती मोरया आवाजा वाणीतून निनांदला

दैनंदिन  ह्या आपणा सा-यांना वेळ सापडला....५


बसालो काढून सवड पेंडालात येऊन

नाही तरी संसाराचे विघ्न कसे दून होईन....६ 


निराकरण करी विघ्नहर्ता गणेशा

सुख भक्तलागी सद्भावना मनी हमेशा....७


जीवन जगतांना पडती अनेक  प्रश्नचिंन्ह 

आपोआपच अंधारानंतर उजेड सोनेरी किरणांचे पडे उन्हं...८


लंबोदर गणेशा दावी नित्य आम्हिला जरी

अहंकार स्वार्थ ठेऊनी जगू नका उधरी....९


कृपाप्रसाद देतो वक्रत्तुंड ना मोदकाची आशा

पार्वती नंदन अनंत चतुर्दशीला निघे मनी भरे निराशा....१०


गणरायांचे विसर्जन चला थोडे दुःखी होऊ

आनंदे त्याचे गीत मनातून मनमुराद गाऊ....११


गणेश भक्त आपण आर्त हाक ऐकेल

चरणी कल्याणाची शाश्वती स्वतःहून वाहू....१२


समर्पित करीत आहे सारे वैभव गणेशाला

तृप्ती वाटेल पहा आता आपल्या मनाला....१३

मा.kvकल्याण राऊतसर 

मराठवाडाप्रदेश लातूर 

9421372689

-----------------------------------

विषय:-गणराया तुझा सहवास

शीर्षक:-"ओ बाप्पा मोरया"


आगमन झाले | बापा गणराया |

सर्वांवर छाया | तुझी असो ||


रथात तुजला | वाजत गाजत |     नाचत हसत | आणिलेया ||


स्थापन करता | भरीला तो हर्ष  |

परिसाचा स्पर्श | तुझ्यामुळे ||


गणेशाचा भव्य | आगळा वेगळा |

रंगीत सोहळा | जाणीला मी ||


सजला मंडप | गीतांची रंगत |

बाळाची संगत | सारीकडे ||


तोरण पताका | जिकडे तिकडे |

हर्ष सारीकडे | सकलात ||


फुलांचा वर्षाव | आंब्याच्या डहाळ्या |

सोनियांच्या सळ्या | चढविल्या ||


गुलाल हळदी | कुंकू व खोबरं |

नैवेद्य मोदक | गणेशाला ||


दहा दिसं चाले | रोज ती आरती |

ते पुजा करती | नियमाने ||


मित्र मेळा सारा | चमचम तारा |

सुगंधीत वारा | मंदिरात ||


मुलांची ही गर्दी | रंगतात फार |

फुलांच्याचं हारा| बाप्पा घाली ||


रोज नवनवे | भक्त आरतीस |

वाढ संगतीस | रोज होतं ||


प्रसाद आनंद | खायाची गंमत |

चाले ती रंगत | नित्यक्रम ||


गणराया तुझा | लाभो सहवास |

वाढावा विश्वास | शरिरात ||


रोज करा भक्ती | मिळे खूप शक्ती |

जडावी आसक्ती | आपसात ||


ठेवा मोठा भाव | करू नका हाव |

सन्मार्ग तो दाव | गणराया ||


नको वैरभाव | आनंदाचे गाव |

 पैलतीरी नाव | ने जीवनी||


निंदू नये कुणा | पार्वतीचा तान्हा|

शंकराचा कान्हा | गुणवान ||


वाचवा आम्हाला | कोरोना आलाया |

रोग घालवाया | या भूवर ||


खांद्यावर घेती | सर्वचं चालती |

मोरया बोलती | सर्वजण ||


खूपच नाचती | उत्साह वाहतो |

आनंदा न्हाहतो | विसर्जनी ||


गावी जाता बाप्पा | देतात निरोप |

लावा ते रोप | बंधुतेचे ||


निरोपाने माझा | अश्रू डोळ्या दाटे |

ह्रदयचं फाटे | विरहाने ||


सर्वांना दे बुद्धी | कल्याण करावे |

कौमूद भरावे | सकलात ||


गुंजतात नारे | चमकती तारे |

आनंदीत सारे | उत्सवात ||


ओ बाप्पा मोरया | परतूनी यावे |

दुष्टा जीरवावे | जाता जाता ||

देविदास हरीदास वंजारे ता.किनवट जि.नांदेड

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा