Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोकण अतिवृष्टी : ४१ हजार कुटुंंबांसाठी ४० कोटींचे अर्थसहाय्

 

कोकण अतिवृष्टी


कोकण अतिवृष्टी : ४१ हजार कुटुंंबांसाठी ४० कोटींचे अर्थसहाय्य


रत्नागिरी: जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित कुटुंबांना कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी प्रती कुटुंब दहा हजाराची मदत देण्यात येणार आहे.

कोकणातील मुंबईसह सहा जिल्ह्यांतील 41 हजार 815 कुटुंबासाठी सुमारे 40 कोटीचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. जुलै महिन्यात कोकणात झालेल्या अतीवृष्टीत अनेक कुटुंबे बाधित झाली.

या आपत्तीत अनेक कुटंबांचे संसार भिजले तर अनेकांचे कपडे तसेच जीवनावश्यक वस्ती वाहून गेल्या. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक पूरहानी झाली. दापोली, संगमेश्वर, राजापूर आदी तालुक्यातही कुटुंबासहीत व्यापार्‍यांचेही नुकसान झाले.

अतिवृष्टीनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यानंतर कोकणातील बाधित ४१ हजार ८१५ कुटुंबांना या अर्थसहाय्यात मदत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशासनाकडे निधी मंजुर करण्यात आला असून हा निधी थेट बाधितांच्या बँक खात्यात संकलित करण्यात येणार आहे.

कोकण अतिवृष्टी : आपत्तीत लाभार्थी कुटुंब (जिल्हानिहाय लाभार्थी कुटुंब)

  1. रायगड 20411
  2. रत्नागिरी 10573
  3. सिंधुदुर्ग 1168
  4. पालघर 4002
  5. ठाणे 1626
  6. मुंबई उपनगर 4035
  7. एकूण 41815
.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा