Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

चिपळूण, खेड, दापोली भागातील पुरग्रस्त व्यापा-यांच्या विद्युत बिलामध्ये सवलत मिळावी: माजी आमदार संजय कदम यांची मागणी




 चिपळूण, खेड, दापोली भागातील पुरग्रस्त व्यापा-यांच्या विद्युत बिलामध्ये सवलत मिळावी: माजी आमदार संजय कदम यांची मागणी


रत्नागिरी प्रतिनिधी:-

दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी पुरग्रस्त व्यापा-यांच्या विद्युत बिलामध्ये सवलत मिळावी यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने व दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी खेड तहसीलदार सौ.प्राजक्ता घोरपडे तसेच महावितरण कंपनीच्या (कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी) अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

२२ जुलै २०२२ रोजी झालेल्या पुरामध्ये व्यापार्याचे नुकसान झाले आहे तरी आम्ही सर्वेच खेड शहरातील व्यापारी नियमित बिल भरणा  करणारे व्यापारी आहोत तरी सदर कालावधीतील आलेली बिल बिलामध्ये आम्हाला राज्य शासनाच्या सवलतीत जाहीर केला. मात्र ती रक्कम कमी प्रमाणात प्राप्त झाले. सदर या सर्व परीस्थितीचे अवलोकन करून आम्हाला यातुन सर्व व्यापार्यांना बाहेर काढण्यासाठी विज बिलात सवलत द्यावी व सहकार्य करावे असे महावितरण कंपनी कडे विनंती करावी व सहकार्य करावे सदरच्या विषया संदर्भात येत्या आठ दिवसांत निर्णय न झाल्यास सर्वच व्यापारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलनाच्या तयारीत आहेत. असा इशाराही देण्यात आला.

सदर वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष सतु कदम, खेड शहाराध्यक्ष राजु शेठ संसारे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे, सुनिल शिंदे, अविनाश वाडकर, नाना सावंत, पिंट्या जगताप तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...............
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा