Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महागाईने त्रस्त जनतेस रत्नागिरी मनसेतर्फे दिलासा

 



महागाईने त्रस्त जनतेस रत्नागिरी मनसेतर्फे दिलासा 


रत्नागिरी प्रतिनिधी:-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तर्फे वाढत्या महागाईने त्रस्त जनतेस दिलासा देण्यासाठी 'शेतकरी ते थेट ग्राहक स्वस्त दरात भाजी विक्री'  या नाविन्य  उपक्रमाची सुरवात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहरअध्यक्ष मयुरेश मडके यांच्या पुढाकाराने करण्यात आली. उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी प्रभाग क्र.७ निवखोल परिसरात करण्यात आला. याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, शहरअध्यक्ष सतिश राणे, उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभाग अध्यक्ष अजिंक्य केसरकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्र.७ मधील विभाग अध्यक्ष अशोक बारगोडे, उपविभाग अध्यक्ष परेश शेट्ये, शाखाध्यक्ष राहुल खेडेकर, उपशाखाध्यक्ष मारुती लोहार, गट अध्यक्ष ब्रिजेश गमरे याचबरोबर गौरव चव्हाण, सौरभ मुळ्ये, ऋतिक रहाटे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच रोहन पुसाळकर व मनोज सारंग यांचेही सहकार्य लाभले. या उपक्रमात टेम्पोच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील विविध भागात जाऊन नागरिकांना स्वस्त दरात भाजी उपलब्ध करून देण्यात येणार असून या उपक्रमाचा सर्व शहरवासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत, शहरअध्यक्ष सतिश राणे व उपशहरअध्यक्ष मयुरेश मडके यांनी केले आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा