Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

‘एलआयसी’कडून विकास अधिकाऱ्यांसाठी ‘प्रगती’ अ‍ॅप


‘एलआयसी’कडून विकास अधिकाऱ्यांसाठी ‘प्रगती’ अ‍ॅप
Advertisement

‘एलआयसी’कडून विकास अधिकाऱ्यांसाठी ‘प्रगती’ अ‍ॅप


भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी)  ‘प्रगती’ (परफॉर्मन्स रिव्हू अ‍ॅप्लिकेशन, ग्रोथ अँड ट्रेंड इंडिकेटर) हे नवीन मोबाइल उपयोजन विकास अधिकाऱ्यांसाठी शुक्रवारी सादर केले.


मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी)  ‘प्रगती’ (परफॉर्मन्स रिव्हू अ‍ॅप्लिकेशन, ग्रोथ अँड ट्रेंड इंडिकेटर) हे नवीन मोबाइल उपयोजन विकास अधिकाऱ्यांसाठी शुक्रवारी सादर केले.

प्रगती अ‍ॅपच्या सहाय्याने, विकास अधिकारी त्यांच्या विक्री प्रतिनिधींच्या कामगिरीबद्दल, त्यांची सक्रियता, हप्त्यांचे संकलन अशी संपूर्ण माहिती मिळवू शकतील आणि चांगली कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींचे मूल्यांकन त्यांना करता येणार आहे. हे उपयोजन (अ‍ॅप) विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर आखण्यासाठीही मदत करणार आहे.

या अ‍ॅपचे अनावरण एलआयसीचे अध्यक्ष एम आर कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश गुप्ता, सिद्धार्थ मोहंती, राज कुमार आणि मिनी ईपे या उपस्थित होत्या.

‘आम्हाला विश्वास आहे की ‘प्रगती’ हे मोबाईल अ‍ॅप आमच्या विकास अधिकाऱ्यांच्या हातातील एक मौल्यवान साधन ठरेल, जे त्यांना त्यांच्या व्यवसाय धोरणांचे नियोजन करण्यास आणि त्यांच्या नेतृत्वाखील संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यास मदत करेल,’ असा एलआयसीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे विश्वास व्यक्त केला आहे.

एलआयसीने पेन्शनधारकांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर बेतलेले ‘जीवन साक्ष्य’ नावाचे मोबाईल अ‍ॅपचेही या निमित्ताने अनावरण केले.

.......................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा