Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

‘सहकारी बँका खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्यासाठी अफवांचे षड्यंत्र’

 

‘सहकारी बँका खासगी क्षेत्राच्या ताब्यात देण्यासाठी अफवांचे षड्यंत्र’

पुणे : देशातील नागरी सहकारी बँकांमधील ठेवीदारांची रक्कम स्वत:कडे वळविण्याचा प्रयत्न खासगी बँकांकडून होत आहे आणि या षड्यंत्राला रिझव्‍‌र्ह बँकेनेही सहकारी बँकांचे रूपांतर खासगी व्यापारी बँकांमध्ये करण्याचे आदेश देऊन अप्रत्यक्ष मदत केली आहे, अशी नाराजीवजा टीका ‘महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी मंगळवारी व्यक्त केली. अफवांचे षड्यंत्र रचून सहकारी बँकिंग क्षेत्राचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल सहकारी बँकांमधील गैरव्यवहारांची आकडेवारी दिली होती. केवळ गैरव्यवहारांची आकडेवारी देणे आणि त्यामध्ये गुंतलेल्या रकमेची आकडेवारी न देताच नागरी सहकारी बँकांबाबत चुकीची चर्चा पुढे सुरू झाली. त्यातूनच देशातील नागरी बँकांतील एकूण गैरव्यवहारांपैकी ६७ टक्के गैरव्यवहार महाराष्ट्रात झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. या पार्श्वभूमीवर अनास्कर यांनी सहकारी बँकांबाबतच्या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले आहे. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील नागरी सहकारी बँकांमधून केवळ ३२३ गैरव्यवहार नोंदविले गेले असून त्यामध्ये गुंतलेल्या रकमेचा खुलासा त्यांनी केलेला नाही. देशातील राज्य सहकारी बँकांमधून २०२०-२१ या आर्थिक वर्षांत एकूण ४८२ गैरव्यवहार झाले. त्यामध्ये सर्वाधिक २१४ केरळ राज्यातील आहेत. त्या खालोखाल मध्य प्रदेशमध्ये ५१, हिमाचल प्रदेशमध्ये ३६, झारखंडमध्ये ३३ आणि त्यानंतर महाराष्ट्रात १८ अशी आकडेवारी देण्यात आली आहे. गैरव्यवहारातून वसूल झालेल्या रकमेची माहिती विचारात घेण्यात आलेली नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेनेही नमूद केले आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील गैरव्यवहारात गुंतलेली रक्कम १ कोटी ८० लाख एवढीच असून व्यापारी बँकांच्या तुलनेत हे प्रमाण ०.००१३ टक्के एवढे अल्प आहे. देशातील १,५३९ नागरी बँकांपैकी ४९८ बँका एकटय़ा महाराष्ट्रात आहेत, याकडेही अनास्कर यांनी लक्ष वेधले. 


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा