Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

 


काव्यपुष्प 


 ..प्रभा..

प्रभा हासरी आली
नवा प्रकाश घेऊन,
काळोख ओढलेल्या
रातीला निरोप देऊन.

..नखाते ज्ञानेश्वर..

      .परभणी.
---------------------------------------------
 शामलाक्षरी

दंड थोपटून मानवा
सृष्टीचा नको घात करू
दंड ठोकेल  निसर्ग दाता 
कदापि हे नको विसरू ॥
दंड र्‍ बाहू , शिक्षा

सौ.शामला पंडित(दीक्षित )

प्रणाली प्रकाशन, चिंचवड
------------------------------------------
निसर्ग             
निसर्ग छान
विविधांगी नटतो
मानवा दान

सौंदर्य दृष्टी
मनुजाला लाभते
आनंद वृष्टी

निसर्ग मित्र
साथ देई सर्वदा
सौख्य सर्वत्र


सौ उषा राऊत
---------------------------------------

विषय:-उंबरठा

माझे सर्वस्व

सखे माझ्या जीवनाचा
खरा आधार तू आहे,
माझ्या ख-या स्वप्नातील
छान उध्दार तू आहे........

सखे मला मिळालेले
भव्य ते दान तू आहे,
मज सर्वच दुःखाचे
खरे निदान तू आहे........

जीवनात जागणारी
आशा अनोखी तू आहे,
जीवनात दावणारी
दिशा अमोल तू आहे........

जगण्याची खरीखुरी
नव स्फूर्ती तुच आहे,
ह्रदयात तेवणारी
स्वप्न मुर्ति तुच आहे........

मनी सप्तसुरातील
फणकार तुच आहे,
विलक्षण ईश्वराचा
अलंकार तुच आहे........

साध्या भोळ्या जीवनाचे
माझे विश्वच तू आहे,
मन मोकळे करतो
माझे सर्वस्व तू आहे........

उंबरठा ओलांड की
माझे अंजन तू आहे,
पुरा झाला तो विरह
माझी पैंजण तू आहे........

तुझा होकारार्थी कौल
सांगे प्रकाश तू आहे,
साथी होऊनीया माझी
बोले आकाश तू आहे........

सोड सारी लाज लजा
माझे वैभव तू आहे,
करू मग मौजमजा
लक्ष्मी संभव तू आहे........

दोघे होऊ एक बरं
माझा श्वास तुच आहे,
तुला कळते सजणे
माझा विश्वास तू आहे........


देविदास हरीदास वंजारे 

ता.किनवट जि.नांदेड

------------------------------------------------------------

  आजची   चारोळी

 नेहमीच गृहीत धरू नका
 तिलाही मन, भावना असते
 बायको काही कपाटातली
 शोभेची बाहुली नसते .

सौ. हेमा जाधव, सातारा

----------------------------------------------

शामलाक्षरी

भार देवा वाहतोस
सृष्टीचा तू कर्ताधर्ता
भार दुःख जीवनात
सोडवितो विघ्नहर्ता ॥
भार= भरवसा , ओझे

सौ.शामला पंडित(दीक्षित )

प्रणाली प्रकाशन, चिंचवड

------------------------------------------------------------

 ..प्रभा..

उजळल्या दिशा दाही
तिमिराचा करून नाश
दान चैतन्याचे घेऊन 
आला उदयास प्रकाश.

नखाते ज्ञानेश्वर..

      परभणी
----------------------------------------

  हरतालिका

भस्मावगुंठीत  रूप  शिवाचे
मनामधे  साठविते
दृढनिश्चय   हा  मनात  धरीते
पार्वती  शंभूला  पूजिते         ।।

आरंभिले  घोर  तप
जाऊनी   घनदाट  काननी
अपर्णा   नाम   तिचे  गाजे
राहीली  पर्ण पर्ण  खाऊनी     ।।

ध्यास  शिवाचा एकच  ह्दयी
अन्य   कुणाला  वरणे  नाही
ईप्सित  व्हावे  पूर्ण   मनीचे
देहाला  बहु  कष्टविते          ।।

त्रैलोक्य  सुंदरी ती  हिमालय  पुत्री
अमान्य  करी  पित्याचे   सांगणे
स्वयंभू   ती  स्वयंसिद्धा
वर स्वतःचा  स्वतः  निवडते    ।।

असीम  भक्ती  , असीम  श्रद्धा
 ध्यास    चंद्रमौळीचा   धरीते
हरतालिकेचे   व्रत  हे  करूनी
 शिव शंभूची   अर्धांगीनी  होते  ।।


 सौ.शैलजा   जाधव

चांदवड  नासिक
------------------------------------------------

विषय:- एकांत

शीर्षक: एकांतवास

कसं सांगू  कुणा सांगू
हवाय मला एकांत
ध्यान धारणा करण्या
पाहिजे आहे निवांत

मन चंचल,चल बिचल
शोधतो मी निवांत
मनाला काबूत ठेवण्या
विचारांना ठेवावे शांत

मनात विचाराचे वादळ
त्याला ठेवण्या शांत
बसावे लागते थोडे एकांत
सुटे विचार रुपी वादळाची भ्रांत

नको , नको ते मनाचे भास
मन चंचल रुपी पाखरू
क्षणात अश्र्वगत धावणारे
एकांतवासाने ते आवरु

मन आकाशी घेप घेई
किती रोकावे मनाला
क्षणोक्षणी भटके वाऱ्यागत
हे सावरता आले पाहिजे सवत:ला

संगीता रामटेके गडचिरोली

मो.९४२३६०४१४०
------------------------------------------------
 
विषय: संकल्प

शीर्षक:- स्वतः पासून करा

करा एक नवा संकल्प

सुरू करा स्वतः पासून
जे समाजातले हुशार पोर
पुढाकाराने देऊ उच्च शिक्षण 

संकल्प करा मनातून 
गुणवंत विद्यार्थी शोधून
एक एक विद्यार्थी घेऊ दत्तक
शिक्षणाचा उचलू खर्च जोमान

संकल्प करा समाजसेवा चा
शोध घ्या म्हातारे,वृद्धांचा
सोडू नको म्हातारे आई वडील
मानसिक आधार द्या बोलण्याचा

करा संकल्प घरातील मुलांनी
आई वडिलांची सेवा मनातूनी
तुम्हास जपले त्यांनी एकेकाळी
आता जपा माय बापासं मायेनी

ठेवा ध्यानी मनी एक संकल्प
स्त्रीचा करा आई सम सन्मान
नको वाईट बोलू, नको फसवनुक
लक्षात ठेवा ताई कुणाची असेन 

संकल्प करा दुसरा आणखीन
सुनेला पाहा आपल्या लेकी सम
बिना कारण, नको कोर्ट कचेरी
देऊ प्रेम, घेऊ प्रेम निट करे काम

संगिता रामटेके गडचिरोली

-------------------------------------------

बघ आम्हांकडे..…


नाही घरदार । नाही कोणी वाली ।
दैना कशी झाली । बघा जरा ।।

पाण्यामध्ये होतो । आम्ही ओलेचिंब ।
दिसे प्रतिबिंब । डबक्यात ।।

आमच्या जन्माचा । काय आहे दोष? ।
आमचा आक्रोश । ऐका जरा ।।

बघणारे सारे । सहाय्यक कमी ।
कोण देतो हमी । रक्षणाची? ।।

दंगलीत आम्ही । प्राण गमावतो ।
आसवे गाळतो । कोण बरं? ।।

फेकलेले आहे । आमच्या नशिबी ।
छळते गरिबी । रात्रंदिस ।।

रस्त्यावर आहे । आमचे निवास ।
रस्त्यावर श्वास । सुटणार ।।

जन्मच आम्हाला । वाटते मरण ।
आमचे जीवन । कुत्र्यासम ।।

कोणीतरी आम्हां । जगवा मालक ।
आम्हाला नाहक । त्रास नको ।।

हक्काचा आम्हाला । एक असो घर ।
आम्ही जन्मभर । त्यात राहू ।।

अजु एकवेळा । बघ आम्हांकडे ।
नाहीत माकडे । आम्ही बरं ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७
--------------------------------------------

 बिछड़ा दोस्त मिला।

खोया  हुआ आज दोस्त मिला।
रेगिस्ता में जैसे कोहिनूर मिला।

हँसता  हँसाता  हुआ   बादलोँ 
में एक चाँद  का  टुकड़ा मिला।

मनमानी  कर  अपनी  हमें पर 
जोर चलाने वाला  दोस्त मिला।

सदियों तक ढूंढा ज़िसे वो मेरा
यार गली के नुक्क्ड़  पर मिला। 

बारिश में भी मेरे  आँसुओ को
पढ़ने वाला  मेरा  दोस्त  मिला।

ज़िंदगी  भर   बैसाखियों  जैसे 
साथ चलने वाला सहारा मिला।

सागर  में   हमारी  डूबती  हुई 
नाव  को  जैसे  पतवार  मिला। 

क़िस्मत  ने  हमें ऐसे  मिलाया 
जैसे सुदामा  को कृष्णा मिला। 

   नीक राजपूत

   9898693535

--------------------------------------------

भाग्य कर्मामध्ये..…

भाग्य कर्मामध्ये । रेषेमध्ये नाही ।
आहे सर्वकाही । तुझ्या हाती ।।

नको हस्तरेषा । कोणाला दाखवू ।
जगाला हसवू । नको वेड्या ।।

धागेदोरे नको । बांधू हातामध्ये ।
नाही जगामध्ये । जादूटोणा ।।

भाग्यवान आहे । म्हणून जन्मला ।
कशाला चालला । काळोख्यात ।।

पुस्तकात आहे । प्रकाश भरून ।
घ्यायचे वेचून । तुज आहे ।।

थोरांचे विचार । वाचून काढणे ।
तयांना स्मरणे । आजीवन ।।

संयम, कौशल्ये । जिद्द, मेहनत ।
कर अवगत । प्रयत्नाने ।।

आयत्याची बुद्धी । रिकामी असते ।
त्वरित नासते । खरोखर ।।

अजु कर्म कर । धागेदोरे तोड ।
आयुष्याला खोड । लावू नको ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७

------------------------------------------

 गधं नोको बनू.…

तुह्याजोळ काय । हाये गमवाले? ।
लाग कमवाले । आतातरी ।।

पाप आनखीन । कितीक करतं? ।
हात बुडवतं । घानीमधी ।।

मानूस हायेस । गधं नोको बनू ।
भाऊ नोको म्हनू । हराम्याले ।।

देशाले गरज । हाये थ्येच कर ।
व्हशीन अमर । मेल्यावर ।।

काय कामी हाये । तुह्ये शौकपानी? ।
घेनं कानीमानी । भावा जरा ।।

दारू, गांजा, अफू । मरासाठी पेतं ।
काय जीव देतं । बिनकामी? ।।

चांगले ईचार । वाच पुस्तकात ।
भर मस्तकात । त्यायलेच ।।

मानसाले पाह्य । मानूस बनून ।
प्रेमानं जगून । राह्य जरा ।।

अरे काईनाई । येत सोबतीले ।
जाशीन मातीले । मिसयुनं ।।

भलं कायच्यात । कायच्यात हानी ।
ठिव लेका ध्यानी । तूच येड्या ।।

अजु तुह्यासाठी । सगये रडन ।
असंच मरन । मांग येड्या ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७
-----------------------------------------------

सुप्रभात      
आनंददायी
सुप्रभात हसली
शांत सावली

रुप धरेचे
शोभे हिरवेगार
रुबाबदार

इंद्रधनुचे
सप्तरंग फुलले
सुर जुळले.

सौ उषा राऊत

---------------------------------------------------------

विषय:-ह्रदयी प्रीत तुझी

शीर्षक:-स्मीत हास्य

ह्रदयी प्रीत तुझी साठवून मी निघालो
ह्रदयी रीत तुझी साठवून मी निघालो........

फुलाची नाजूक कळी गालावर खळी
सौंदर्य ते नयनी दाटवून मी निघालो........

तुझे स्मीत हास्य मंजूळ गोड भाष्य
सदासर्वदा मनी गाठवून मी निघालो........

घेतली उंच भरारी माझा बाणा करारी
तुझ्या मनास आज पटवून मी निघालो........

भिजली ओलीचिंब दिसे तुझे प्रतिबिंब
भावनांना माझ्या ह्या नटवून मी निघालो........

तू दूर मज पासून नातं अतूट ठेव
हवेत प्रेम संदेश पाठवून मी निघालो........

वाटेत असू दे कितीही प्रचंड निखारे
येणाऱ्या संकटांना हाटवून मी निघालो........


✍️देविदास हरीदास वंजारे

 ता.किनवट जि.नांदेड

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा