Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘गोट्या’ खेळून ‘बेरोजगार दिन’ म्हणून केला साजरा


पंतप्रधान मोदींचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘गोट्या’ खेळून ‘बेरोजगार दिन’ म्हणून केला साजरा
Advertisement

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘गोट्या’ खेळून ‘बेरोजगार दिन’ म्हणून केला साजरा



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ‘बेरोजगार दिन’ म्हणून सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला. या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील व प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रामहरी रूपनवर, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी सहभाग घेतला होता.

काँग्रेस भवनासमोर झालेल्या या लक्षवेधी आंदोलनात मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून वाढत्या बेरोजगारीचे प्रदर्शन म्हणून चक्क गोट्या खेळण्यात आल्या.

यावेळी बोलताना धवलसिंह मोहिते पाटील यांनी, नरेंद्र मोदी म्हणजे देशाला लाभलेला आतिशय खोटा पंतप्रधान, अशा शब्दात टीकास्त्र सोडले. तसेच, ”प्रत्येक वर्षात दोन कोटी रोजगार देण्याच्या भूलथापांसह इतर अनेक खोटी आश्वासने देऊन नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि लगेचच त्यांना या सर्व आश्वासनांचा विसर पडला. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण देश अधोगतीकडे वाटचाल करीत आहे. त्याचे खापर निर्लज्जपणे काँग्रेस पक्षावर फोडले जात आहे. लाखो छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. तरूणांना रोजगार मिळणे दुरापास्त झाल्याने सार्वत्रिक निराशेचे वातावरण असताना पुन्हा मोदी सरकार जुमलेबाजी करीत  आहे, ”  असा आरोप मोहिते-पाटील यांनी यावेळी केला.

.......................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा