
पावसाचा ऑगस्टमधील १९ वर्षांतील नीचांक
हवामान विभागाची नोंद; अंदाज चुकला
देशात ऑगस्ट महिन्यात पावसाचा गेल्या १९ वर्षातील नीचांक झाला असून २४ टक्के कमी पाऊस पडला असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. ९-१६ ऑगस्ट तसेच २३ ते २७ ऑगस्ट या दरम्यान वायव्य, मध्य व शेजारील द्वीपकल्प या भागात तसेच पश्चिाम किनारपट्टीत कमी पाऊस पडला आहे. ऑगस्टमध्ये व्यवस्थित पाऊस होईल असा अंदाज आधी भारतीय हवामान विभागाने दिला होता.
ऑगस्ट २०२१ मध्ये देशात प्रदीर्घ कालीन सरासरीच्या उणे २४ टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात २००२ पासून प्रथमच इतका कमी पाऊस पडला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस १ जूनपासून सुरू होतो तो ३० सप्टेंबरपर्यंत चालतो.
जून महिन्यात १० टक्के जास्त पाऊस पडला होता. तर जुलै व ऑगस्टमध्ये अनुक्रमे ७ व २४ टक्के कमी पाऊस पडला आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
देशात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या २४ टक्के कमी पाऊस पडला असून मध्य विभागात तो ३९ टक्के कमी पडला. यात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा यांचा समावेश होतो. नैऋत़् मोसमी पाऊस उत्तर भारतात ३० टक्क्यांनी कमी पडला आहे. दक्षिण द्वीपकल्पात पाऊस १० टक्के कमी पडला असून पूर्व व ईशान्येकडे सरासरीच्या दोन टक्के अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये अवक्षेपामुळे चांगला पाऊस होईल असा अंदाज दिला आहे.
कारण काय?
कमी दाबाचे पट्टे तयार होण्याचे प्रमाण कमी झाले होते तसेच ऑगस्ट २०२१ मध्ये पश्चिामेकडे कमी दाबाचे पट्टे आलेच नाहीत त्यामुळे मध्य भारतात कमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात उष्णकटिबंधीय हिंदी महासागर पट्ट्यात महिनाभराच्या काळात निगेटिव्ह इंडियन डायपोलचा परिणाम दिसून आला तो भारतीय मोसमी पावसाला प्रतिकूल ठरला आहे.
आकड्यांच्या भाषेत…
११ ऑगस्ट, १८ ऑगस्ट व २५ ऑगस्ट या तीन आठवड्यांत कमी पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. या काळात अनुक्रमे एकूण संपूर्ण देशात ३५ टक्के, ३६ टक्के व २१ टक्के असा पाऊस झाला तो सरासरीच्या खूप कमी होता.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा